पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून गणपतीचे आशीर्वाद मागितले आहेत.पंतप्रधान कार्यालयाच्या संदेशात म्हटले आहे की, गणपत्ती बाप्पा मोरया, गणेश चतुर्थीनिमित्त सर्वाना शुभेच्छा. आम्ही श्रीगणेशापुढे नतमस्तक आहोत. गणेशाने आपणा सर्वाचे जीवन संपन्न करावे व जीवन शांतता, आनंद व बुद्धीने परिपूर्ण व्हावे अशी प्रार्थना त्यांनी गणेशाच्या चरणी केली आहे.