रुग्णायातील कर्मचाऱ्यांना लगेच ओळखता यावे तसेच रुग्णांना उत्तम उपचार देता यावेत यासाठी हरियाणा सरकारने डॉक्टरांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. त्यासाठी सरकारने निर्देश जारी केले असून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत सेवा देणाऱ्या डॉक्टरांना हा ड्रेस कोड लागू असेल. सराकरने जारी केलेल्या निर्देशानुसार डेनिम जिन्स, स्कर्ट, बॅकलेस टॉप, पलाझो पँट घालण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच महिला डॉक्टरांना मेकअपही करता येणार नाही. याच कारणामुळे हरियाणा सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

हेही वाचा >>> सेन्सॉरशिप घालू शकत नाही सांगत, सुप्रीम कोर्टाकडून ‘बीबीसी’ विरोधातली हिंदू सेनेची याचिका निकालात

हरियाणा सरकारने कोणता निर्णय घेतला आहे?

हरियाणा सरकारने ९ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांच्या ड्रेस कोडबाबत एक धोरण जारी केले आहे. या धोरणानुसार राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत सेवा देणाऱ्या डॉक्टरांना ड्रेस कोडची सक्ती करण्यात आली आहे. सोबतच कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करू नयेत, याची सूची देण्यात आली आहे. या नव्या धोरणानुसार डॉक्टरांना डेनिम जिन्स, पलाझो पॅन्ट, बॅकलेस टॉप, स्कर्ट्स परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच महिला डॉक्टरांना मेकअप करता येणार नाही. तसेच कामावर असताना महिला डॉक्टरांना दागिने घालता येणार नाहीत. तसेच पुरुष डॉक्टरांना आपल्या शर्टच्या कॉलरपर्यंतच केस ठेवता येतील. महिला डॉक्टरांना नखे वाढवण्यासही मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> गौतम अदाणी प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक, नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले; “मुंबईत येत असाल तर…”

कामावर असले तरी अनुपस्थित असल्याचे गृहित धरले जाणार

हरियाणा सरकारने ९ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना आपल्या नव्या धोरणाबाबत कळवलेले आहे. तसेच जे डॉक्टर्स हे नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कामावर असले तरी ते अनुपस्थित आहेत, असे गृहित धरण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>>“रोहित पवार पोरकट, त्यांची…”; सोलापूर लोकसभेच्या जागेवरून केलेल्या विधानानंतर प्रणिती शिंदेंची आगपाखड

कोणते कपडे परिधान करण्यास मनाई?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरियाणा सरकारच्या या धोरणानुसार डेनिम जिन्स परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच स्वेट शर्ट्स, डेनिम स्कर्ट, शॉर्ट्स, स्ट्रेचेबल टी शर्ट किंवा पॅन्ट, बॉडी हगिंग पॅन्ट, वेस्ट लेंथ टॉप्स, स्ट्रॅपलेस टॉप, बॅकलेस टॉप, क्रॉप टॉप, डीप नेक टॉप, ऑफ शोल्डर ब्लाऊज, स्निकर्स, स्लिपर्स परिधान करता येणार नाही. या नव्या धोरणात, सुरक्षारक्षक, वाहनचालक, स्वच्छता कर्मचारी, स्वयंपाक कर्मचारी यांनादेखील ड्रेस कोड ठरवण्यात आलेला आहे.