हरयाणातील जिंद विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाने आघाडी घेतली असतानाच काँग्रेस आणि जननायक जनता पक्षांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात येत असून हा तर ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. या दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिंद विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक पार पडली असून या निवडणुकीत ७० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे रणदीपसिंह सुरजेवाला रिंगणात आहेत. तर भाजपातर्फे कृष्ण मिद्धा रिंगणात आहेत. याशिवाय जननायक पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षाचेही उमेदवार रिंगणात आहे. आठव्या फेरी अखेर भाजपा उमेदवार ९, ३१० मतांनी आघाडीवर आहे. अजून मतमोजणीच्या पाच फेऱ्या बाकी आहेत. काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहे.

मतमोजणीदरम्यान काँग्रेस आणि जननायक जनता पक्षाच्या पोलिंग एजंटने ईव्हीएमवर आक्षेप घेतला. ईव्हीएममधील आकडेवारी जुळत नसल्याचे या दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे. यामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे निर्माण झाले होते. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याचे वृत्त आहे.  तीन मशीनमध्ये फेरफार झाल्याचा संशय असून भ्रष्ट आणि नाकर्त्या सरकारला सत्तेतून हटवणारच, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana jind assembly bypoll bjp evm tampering alleges congress jjn
First published on: 31-01-2019 at 14:02 IST