एका मृत महिलेच्या पोटात सर्जिकल कात्री (शस्त्रक्रिया करताना वापरली जाणारी कात्री) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना हरियाणातील असून याप्रकरणी आता रूग्णालयाची चौकशी केली जात आहे. झालं असं की, हरियाणातील एक महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर दोनच दिवसांत त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. दोन दिवसानंतर नातेवाईक जेव्हा अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत आले, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण त्यांना त्या अस्थीत एक सर्जिकल कात्री दिसून आली. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णाच्या पोटात कात्री राहिल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेपर मिल कॉलनीतील रहिवासी सुरेंद्र सिंह यांची पत्नी निर्मला (वय ५२) यांना अनेक दिवसांपासून पोटात दुखत होते. उपचारासाठी त्यांना जगाधरी येथील एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले. निर्मला यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय काही पर्याय नसल्याचे त्यांना सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana woman dies after operation surgical scissors found in bone
First published on: 06-08-2017 at 13:11 IST