पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर एक वक्तव्य केलं. ते असं म्हणाले की भारतात कोणत्याही प्रकारची घुसखोरी चीनकडून झालेली नाही. मग ५ आणि ६ मे रोजी जे झालं ते काय होतं? १६ आणि १७ जूनला काय झालं? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली आहे का? असा प्रश्न आता काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी विचारला आहे. जर घुसखोरी झालीच नाही असं पंतप्रधान म्हणत आहेत तर मग भारताचे २० जवान शहीद कसे झाले? गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि चीन या दोन देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कसा झाला? चकमकी कशा घडल्या ? हे प्रश्नही चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- “जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं?”; राहुल गांधींकडून पंतप्रधानांची ‘प्रश्न’कोंडी

आणखी वाचा- नेपाळला सोबत घेतलं, आता बांगलादेशला आपल्या बाजूला वळवण्यासाठी चीनची मोठी खेळी

सोमवारी गलवानमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. चिनी सैनिकांनी धोका देऊन केलेल्या हल्ल्यात ही घटना घडली. त्यानंतर चीनविरोधात देशभरात संताप व्यक्त होतो आहे. अशात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सुमारे २० पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत शरद पवार, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या दिग्गजांनी मोदींना काही सल्ले दिले, सूचनाही दिल्या. तसंच देश एकजूट रहावा यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत अशीही ग्वाही दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केलेल्या भाषणात भारतात घुसखोरी झालेली नाही असं म्हटलं होतं. यावरुनच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Has pm given clean chit to china by saying no intrusion asks p chidambaram scj
First published on: 20-06-2020 at 14:02 IST