राजधानी दिल्लीला शुक्रवारी मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाल्याने कार्यालयात जाणाऱ्यांच्या हालास पारावार उरला नाही.
आयटीओ, काश्मीर गेट, दक्षिण विस्तारित, लक्ष्मीनगर, धौला कुआं, आझाद मार्ग, गुरुद्वारा नानकपुरा, बदरपूर, आश्रम चौक, मूलचंद अंडरपास, अप्सरा बॉर्डर, यमुना विहार, ओख्ला मंडी, उत्तमनगर, कोजोरी चौक आणि नेहरू प्लेस येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
करोल बाग येथील आपल्या घरातून सकाळी आठ वाजता बाहेर पडलो आणि लाजपतनगर येथे पोहोचण्यास आपल्याला तब्बल अडीच तास लागले, असे सोनल लालचंदानी यांनी सांगितले. वास्तविक हे अंतर केवळ ४०-४५ मिनिटांचे आहे.सकाळी आठ वाजल्यापासून शहरात १५.६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.