काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर घराणेशाहीचा आरोप करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह करतो? असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर भाजपाकडून राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले गेले. या वादात आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनीही उडी घेतली असून त्यांनी राहुल गांधी यांना ‘अशिक्षित मुलगा’ (illiterate child) असल्याचे म्हटले. राहुल गांधी अशिक्षित असून त्यांना राजकारणाची फारशी माहिती नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी मिझोराममध्ये मंगळवारी (दि. १७ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपावर टीकास्र सोडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयमध्ये काय करतोय? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.

“अमित शाह यांचा मुलगा काय करतो? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा काय करतो? मागच्या वेळी मी ऐकले की, अमित शाह यांचा मुलगा भारतीय क्रिकेट चालवतो. भाजपाच्या इतर नेत्यांकडे पाहा आणि तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की त्यांचे मुले काय करत आहेत? भाजपाच्या नेत्यांची अनेक मुले राजकारणात आहेत. त्यांच्यातही घराणेशाही आहे”, असे विधान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केले होते.

What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”
Congress Leader Kamalnath Promised Giving Article 370 Masjid Place But Real Video Is Different
“३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका
kerala politics rahul gandhi
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका
nagpur, Anurag Thakur, Criticizes Congress, india alliance leaders no trust, no trust on rahul gandhi, rahul gandhi s leadership, bjp, lok sabha 2024, nda, election 2024,
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”

हे वाचा >> Video: “…तर मी मोदींऐवजी शरद पवारांना हा प्रश्न विचारला असता”, राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं; ‘त्या’ प्रश्नावर दिलं उत्तर!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह हा बीसीसीआयचा सचिव असून एशियन क्रिकेट कौन्सिलचा अध्यक्ष आहे. तर राजनाथ सिंह यांचा मुलगा उत्तर प्रदेशमध्ये आमदार आहे.

राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री सर्मा म्हणाले, “अमित शाह यांच्या मुलाचा विषय इथे कुठे आला? त्यांचा मुलगा भाजपामध्ये नाही, पण राहुल गांधी यांचे संपूर्ण कुटुंब राजकारणात आहे. बीसीसीआय ही भाजपाची शाखा असेल, असे कदाचित राहुल गांधी यांना वाटले असेल. कारण ते अक्षिशित आहेत.”

राजनाथ सिंह यांचा मुलगा हा फक्त आमदार आहे. त्याची तुलना प्रियांका गांधी (काँग्रेसच्या सरचिटणीस) यांच्याशी होऊ शकते का? राजनाथ सिंह यांच्या मुलाचे भाजपावर नियंत्रण आहे का? असेही प्रश्न सर्मा यांनी उपस्थित केले. तसेच राहुल गांधी यांनी आधी नव्या लोकांना राजकारणात संधी द्यावी आणि मग त्यानंतर घराणेशाहीच्या राजकारणावर बोलावे.

आणखी वाचा >> ‘काँग्रेस घराणेशाहीवर चालणारा पक्ष, भारतात ओबामांसारखा नेता होणे अशक्य’; शशी थरूर यांचे राहुल गांधींबाबत मोठे विधान

राहुल गांधी यांना राजकारणाचे काहीच ज्ञान नाही आणि त्यामुळे घराणेशाहीच्या केंद्रस्थानी ते स्वतःच आहेत, हे त्यांना माहीत नाही. आई, वडील, आजोबा, बहीण, भाऊ… त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकजण राजकारणात आहे आणि पक्षावर त्यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे घराणेशाहीची तुलना ते भाजपाशी कसे काय करू शकतात? असाही प्रश्न सर्मा यांनी उपस्थित केला.