अदाणी समूहाने रविवारी न्यूयॉर्क स्थित हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाला प्रत्युत्तर दिलं. अदाणी समूहाने ४१३ पानांचं उत्तर दिलं. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (सोमवारी) हिंडेनबर्गने अदाणी समूहावर पलटवार केला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटलं आहे की, राष्ट्रवादाचा फुगा फूगवून तुम्ही आरोपांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, तसेच लोकांची फसवणूक करू शकत नाही.

हिंडेनबर्गने म्हटलं आहे की, “भारत एक मोठी लोकशाही आहे. एका मजबूत भविष्यासह भारत ही उदयोन्मुख महासत्ता आहे. परंतु अदाणी समूह स्वतःला भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळून व्यवस्थितपणे भारत लुटतोय.”

मूळ प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा अदाणी समूहाचा प्रयत्न

हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटलं आहे की, “काही तासांपूर्वी अदाणी समूहाने ४१३ पानाचं उत्तर जारी केलं आहे. परंतु याद्वारे ते मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करत आहेत. आम्ही ‘मॅनहॅटने मॅडऑफ’ आहोत असा दावा करून त्यांनी स्वतःवरील आरोपांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आमचा अहवाल हा भारतावरील नियोजित हल्ला असल्याचा दावा करत त्यांनी राष्ट्रवादी कथा सांगायला सुरुवात केली आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास अदाणी समूहाने भारताच्या यशात स्वतःची वाढ करून घेतली आहे. त्याचबरोबर त्यांचे अध्यक्ष गौतम अदाणींची संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

हे ही वाचा >> भारत जोडो यात्रेचा आज समारोप समारंभ, शिवसेनेसह १२ पक्ष सहभागी होणार, ‘या’ ५ पक्षांना निमंत्रण नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंडेनबर्गने उपस्थित केले ८८ प्रश्न

हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटलं आहे की, “आमच्या अहवालाद्वारे आम्ही अदाणी समूहाला ८८ प्रश्न विचारले आहेत. त्यापैकी ६२ प्रश्नांची उत्तरं देण्यात अदाणी समूह अपयशी ठरला आहे. त्याउलट त्यांनी आमचा अहवाल हा अदाणी समूहाऐवजी भारतावरील हल्ला असल्याचं म्हटलं.”