केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ

सन २०१३च्या ज्ञानपीठ पुरस्कारावर प्रसिद्ध हिंदी कवी केदारनाथ सिंह यांच्या नावाची मोहोर उमटली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे सिंह हे दहावे हिंदी साहित्यिक आहेत.

सन २०१३च्या ज्ञानपीठ पुरस्कारावर प्रसिद्ध हिंदी कवी केदारनाथ सिंह यांच्या नावाची मोहोर उमटली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे सिंह हे दहावे हिंदी साहित्यिक आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ८० वर्षीय केदार सिंह हे ४९वे साहित्यिक ठरले आहेत. ११ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सिंह यांनी कथा, निबंध आदी साहित्यप्रांतातही यशस्वी मुशाफिरी केली असून ‘अभी बिल्कुल अभी’, ‘यहाँसे देखो’ आदी त्यांच्या महत्त्वपूर्ण साहित्यकृती हिंदी भाषिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hindi poet kedarnath singh to get jnanpith award

ताज्या बातम्या