बुधाना शहरात ऑनर किलिंगच्या एका घटनेत एकोणीस वर्षांच्या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी ठार केले, तर तिच्या मित्राने आत्महत्या केली.
सदर मुलगी याच शहरातील मुबारिक हसन (वय २१) या त्याच शहरातील तरुणाच्या प्रेमात पडली होती. त्यांच्या संबंधांना तिच्या कुटुंबीयाचा विरोध होता. यावरून झालेल्या वादात काल तिचा गळा दाबून खून करण्यात आला व नंतर तिच्या अहसान व आशू या दोन भावांनी तिचे प्रेत पंख्याला अडकवून दिले असे पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले.
दरम्यान, तिच्या मित्राचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडला. शवविच्छेदनात मुलीची गळा दाबून हत्या झाल्याचे तर मुलाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलीच्या भावांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.