Good Bye Video : Good Bye हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये व्ह्लॉगर जोडप्याचे मृतदेह त्यांच्या घरात मिळाल्याची घटना समोर आली आहे. या दोघांच्या मुलाला त्याच्या आई आणि वडील यांचा मृत्यू झाला आहे ही बाब सर्वात आधी कळली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.
कुठे घडली ही घटना?
केरळच्या तिरुवनंतपुरम या जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. ज्या दोघांचे मृतदेह सापडले त्यापैकी पुरुषाचं नाव सेल्वराज होतं. तर महिलेचं नाव प्रिया असं होतं. या दोघांनी My Life Bids Farewell या गाण्याचा व्हिडीओ अपलोड केला. त्यात त्यांचे अनेक फोटोही होते. या घटनेनंतर या दोघांचेही मृतदेह आढळून आले.
पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेल्वराजचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाला. मात्र त्याची पत्नी प्रिया हिच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४० वर्षीय प्रियाच्या शरीरावर गळा आवळल्याच्या खुणा आहेत. तसंच सेल्वराजच्या मृत्यूच्या बारा तास आधी तिचा मृत्यू ( Good Bye Video ) झाला आहे.
ज्यांचे मृतदेह मिळाले ते कोण होते?
सेल्वराज आणि प्रिया यांचा मुलगा कोची या ठिकाणी ट्रेनी म्हणून कार्यरत आहेत. तो घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या आई वडिलांचे मृतदेह त्याला दिसले. सेल्वराज आणि प्रिया हे दोघं YouTube वर प्रसिद्ध होते. ते इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव सेलू फॅमिली असं होतं. हे दोघंही अनेकदा व्हिडीओ पोस्ट करत असत. गुडबायचा व्हिडीओ ( Good Bye Video ) पोस्ट केल्यानंतर या दोघांचे मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी पुढे तपास सुरु केला आहे.
शुक्रवारी काय घडलं?
शुक्रवारी या दोघांनीही GoodBye असं म्हणत एक व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केला. या व्हिडीओत एक मोंटाज आणि या दोघांचे अनेक फोटो दिसत आहेत. त्यांनी जे गाणं या व्हिडीओला जोडलं आहे ते मल्याळी गाणं आहे. त्याचा अर्थ गुड बाय असा होतो. शुक्रवारचा संपूर्ण दिवस या दोघांचा मुलगा त्यांना फोन करत होता. आई वडिलांनी दिवसभर फोन का उचलला नाही हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा तातडीने शनिवारी घरी आला. तेव्हा त्याला घरात दोन मृतदेह दिसले जे त्याच्या आई आणि वडिलांचे होते. अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.