Sub-Divisional Magistrate अर्थात उपविभागीय दंडाधिकारी महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. निशा नापित असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. निशाचा पती गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार होता. त्याने तिची उशीने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला असं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणात निशा नापित यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे. मनिष शर्मा असं या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये असलेल्या डिंडौरी जिल्ह्यातली ही घटना आहे. उपविभागीय दंडाधिकारी म्हणून निशा नापित याछ ठिकाणी कार्यरत होत्या. त्यांच्या बेरोजगार पतीने म्हणजेच मनिष शर्माने पत्नी निशाची उशीने तोंड दाबून हत्या केली. तसंच त्याने पुरावे मिटवण्यासाठी पत्नीचे कपडे, उशीचं कव्हर, पलंगावरची चादर हे सगळं वॉशिंग मशीनमध्ये ठेवून धुतलं होतं. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. निशा नापित यांनी त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये, बँक खात्यांमध्ये आणि विमा पॉलीसींमध्ये वारस म्हणून आपलं नाव दिलं नव्हतं हा राग मनिषच्या मनात होता. असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश

निशा नापित यांच्या बहिणीचं म्हणणं काय?

निशा नापित यांची बहीण निलीमा यांनी मनिष शर्मावरच हत्येचा आरोप केला होता. “मनिष शर्मा माझ्या बहिणीला (निशा नापित) पैशांसाठी सातत्याने त्रास देत होता. माझ्या बहिणीला कुठलाही आजार नव्हता. मनिषनेच तिची हत्या केली. कारण हत्येच्या दुसऱ्या दिवशी घरी आलेल्या गृहसेविकेला त्याने निशाच्या खोलीत जाऊ दिलं नव्हतं.” निशा नापित यांच्या बहिणीने हे सांगितल्यावर पोलिसांनी मनिष शर्माला अटक केली. त्यानंतर दोन तासांमध्ये हत्येचा उलगडा झाला. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

निशा नापित आणि मनिष शर्मा यांचं लग्न एका विवाह जुळवण्याच्या मॅट्रिमोनी साईटच्या आधारे झालं होतं. २०२० मध्ये या दोघांचं लग्न झालं. निशा नापित यांच्या बहिणीने दावा केला आहे की आमच्या कुटुंबाला या लग्नाबाबतही फारशी माहिती नव्हती. कारण लग्न केल्यानंतर आम्हाला काही दिवसांनी याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी सुरुवातीला जेव्हा मनिषला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने खोटी कहाणी रचली. माझ्या पत्नीला किडनीचा आजार होता. शनिवारी तिने कुठलं तरी व्रत ठेवलं होतं. रात्री तिला उलटी झाली त्यानंतर ती झोपली मात्र उठलीच नाही असं त्याने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी जेव्हा त्याला इंगा दाखवला तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.