scorecardresearch

Premium

लंडनमधील हॉटेलमध्ये अत्यंत भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२० गाड्या घटनास्थळी

ब्रिटनची राजधानी लंडन येथील मँडरिन ओरिएंट हॉटेलमध्ये भीषण आग लागली होती

लंडनमधील हॉटेलमध्ये अत्यंत भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२० गाड्या घटनास्थळी

ब्रिटनची राजधानी लंडन येथील मँडरिन ओरिएंट हॉटेलमध्ये भीषण आग लागली होती. आग इतकी भीषण होती की, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवळपा १२० गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवळपास १२० गाड्या आणि २० फायर इंजिन घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. नाइट्सब्रिज येथे हे हॉटेल आहे.

आग लागल्यानंतर संपुर्ण हॉटेल रिकामं करण्यात आलं असून सर्वांना बाहेर काढण्यात आलं असल्याचं हॉटेलकडून सांगण्यात आलं आहे. आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत होते. आग नेमकी कशामुळे लागली होती याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

आग विझवण्यासाठी तब्बल १०० जवान घटनास्थळी उपस्थित होते अशी माहिती लंडन अग्निशमन दलाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हॉटेलच्या २५० कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Huge fire in london hotel mandarin oriental hotel

First published on: 07-06-2018 at 05:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×