Hyderabad Couple: अश्लील व्हिडीओ तयार करून इंटरनेटवर विकल्याप्रकरणी एका दाम्पत्याला हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सनं अटक केली आहे. ४१ वर्षीय पती आणि त्याची ३७ वर्षीय पत्नी इंटरनेटवरील एका ॲपवर खासगी क्षणांचे लाईव्ह स्ट्रिमिंग करत होते. ॲपवरील युजर्सकडून लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी ते एका युजरकडून दोन हजार रुपये घेत होते. तर अश्लील व्हिडीओची क्लिप ५०० रुपयांत विकत होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयात शिकणाऱ्या आपल्या मुलींचा शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी सदरचे कृत्य केल्याचे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

अटक करण्यात आलेला व्यक्ती टॅक्सी चालक तर त्याची पत्नी गृहिणी आहे. पैशांसाठी सदर कृत्य केल्याचे दोघांनीही मान्य केले. पोलिसांनी अटक करताना दाम्पत्याकडील कॅमेरा आणि इतर उपकरणे जप्त केली.

१७ जून रोजी या दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांच्या दोन्ही मुलींना या प्रकाराची कोणतीही कल्पना नव्हती. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, मुलींच्या महाविद्यालयाचा खर्च दाम्पत्याला झेपत नव्हता. मात्र मुली शिक्षणात हुशार असल्यामुळे त्यांना मुलींचे शिक्षणही पूर्ण करायचे होते. त्यामुळे दाम्पत्याने सोप्या मार्गाने पैसे मिळविण्यासाठी सदर पाऊल उचलले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय टॅक्सी चालक काही महिन्यांपासून आजारी होता. त्यामुळे त्याला टॅक्सी चालवणे जमत नव्हते. वैद्यकीय खर्च आणि मुलींच्या शिक्षणाचा भार उचलण्यासाठी दाम्पत्याने सदर पाऊल उचलल्याचे सांगितले. १७ जून रोजी जेव्हा पोलिसांनी दाम्पत्याच्या घरी धाड टाकून त्यांना अश्लील कृत्य करताना पकडले.

हैदरबादमध्ये दाम्पत्य राहत असलेल्या परिसरातील काही स्थानिकांनी याबद्दलची गुप्त वार्ता पोलिसांना दिली होती. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी सदर कारवाई केली. द फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या बातमीनुसार, मागच्या चार महिन्यांपासून दाम्पत्याने सदर प्रकार सुरू केला होता. तसेच त्यांनी सोशल मीडियावरून व्हिडीओ व्हायरल केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओळक लपविण्यासाठी मास्कचा वापर

व्हिडीओंमधून आपली ओळख उघड होऊ नये, यासाठी दाम्पत्याकडून मास्कचा वापर करण्यात येत होता. ॲपवरील तरूणांनी त्यांचा कटेंट विकत घेतल्याचेही समोर आले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.