हैदराबादमध्ये ३५ वर्षीय पत्नीने आत्महत्या केली. या महिलेचा पतीसोबत ब्लाउजवरुन वाद झाला होता, त्यानंतर तिने हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, विजयलक्ष्मी पती श्रीनिवाससोबत हैदराबाद येथील अंबरपेटमधील गोलनाका थिरुमला नगरमध्ये राहत होती. पतीसोबत वाद झाल्यानंतर विजयलक्ष्मीचा मृतदेह घरात पडलेला आढळून आला.

श्रीनिवास घरोघरी जाऊन साड्या आणि ब्लाउज बनवण्याच्या वस्तू विकत असे. याशिवाय तो घरी ब्लाउजही शिवायचा. श्रीनिवासने पत्नीसाठी ब्लाउज शिवला होता. पण विजयलक्ष्मी या ब्लाउजबद्दल नाराज होती. त्यानंतर विजयालक्ष्मीने पतीला पुन्हा ब्लाउज शिवण्यास सांगितले.

harsul jail police murder marathi news
छत्रपती संभाजीनगर: हर्सूल कारागृह आवारात पोलिसाचा खून; एक गंभीर
madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
Shivsena UBT Criticized Raj Thackeray
“राज ठाकरेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला, कोल्ह्याला द्राक्षं आंबट”, म्हणत शिवसेना उबाठा नेत्यांची बोचरी टीका
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक

यानंतर श्रीनिवासने पत्नीला स्वतः शिवण्यास सांगितले. पण विजयलक्ष्मी तिच्या नवऱ्याच्या अशा बोलण्यामुळे ही फारच नाराज झाली. यानंतर विजयलक्ष्मीने दुसऱ्या दिवशी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. दुसऱ्या दिवशी त्यांची मुलं शाळेतून परत आली तेव्हा त्यांना खोली अजूनही बंद असल्याचे पाहिले.

आतून आवाज न आल्याने महिलेच्या पतीला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर घरी आल्यानंतर श्रीनिवासने खोलीचा दरवाजा उघडला. मात्र खोलीत प्रवेश केल्यावर त्यांला धक्का बसला. विजयलक्ष्मीचा मृतदेह खोलीत फासावर लटकलेला होता.

अंबरपेटचे पोलीस निरीक्षक पी. सुधाकर म्हणाले की, नवऱ्याच्या म्हणण्यानुसार, विजयालक्ष्मी जेव्हा जेव्हा ती कोणत्याही गोष्टीवर नाराज होती तेव्हा ती स्वतःला कोंडून घेत होती, त्यामुळे त्यांना कोणतीही दुर्घटना घडण्याची शंका नव्हती. विजयलक्ष्मीने कोणतीही सुसाईड नोट मागे न ठेवल्याने पोलिसांनी संशयास्पद मृत्यूप्रकरणी तपास सुरू केला आहे.