काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिकेला पोहचले आहेत. सॅनफ्रान्सिकोमध्ये त्यांनी अमेरिकेतल्या भारतीयांशी चर्चा केली. तसंच अमेरिकेतल्या खासदारांनाही ते भेटणार आहेत. राहुल गांधी मंगळवारी उशिरा अमेरिकेला पोहचले. सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर राहुल गांधींचं स्वागत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोडा आणि त्यांच्या सहाकाऱ्यांनी केलं. काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी इमिग्रेशनच्या रांगेत दोन तास उभे होते. त्यांना इमिग्रेशन क्लिअर होईपर्यंत दोन तास वाट बघावी लागली.
इमिग्रेशनच्या रांगेत जेव्हा राहुल गांधी
राहुल गांधींचा सॅन फ्रान्सिस्को दौरा सुरु झाला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर राहुल गांधी एक पत्रकार परिषदही घेणार आहेत. तसंच वॉशिंग्टन डीसी आणि थिंक टँक सह बैठकही करणार आहेत. सहा दिवसांचा हा दौरा असणार आहे. भारतीय अमेरिकन्सनाही संबोधित करु शकतात. तसंच वॉल स्ट्रीटचे अधिकारी आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यांचा हा दौरा ४ जूनला न्यूयॉर्कमध्ये त्यांची एक सभा होईल त्यानंतर या दौऱ्याचा समारोप होणार आहे.
मार्चमध्ये गेली राहुल गांधींची खासदारकी
मोदी या आडनावावरुन एक वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ मध्ये निवडणूक प्रचारा दरम्यान केलं होतं. यानंतर त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला. हे प्रकरण सुरत कोर्टात गेलं. सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींना खासदारकी गमवावी लागली. खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींनी त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्टही सरेंडर केला होता. तसंच दिल्ली उच्च न्यायालयात सामान्य पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज केला होता. जो अर्ज न्यायालयाने मंजूर केला.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am a common man says rahul gandhi as he arrives in us san francisco scj