सलमान खानचा धर्म कोणता.. भारतीय! खुद्द सलमाननेच बुधवारी येथील न्यायालयात ही बाब स्पष्ट केली. काळवीट शिकारप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी सलमान येथील न्यायालयात हजर झाला होता. सलमान येथील न्यायालयात आला असता न्यायाधीशांनी त्याला त्याच्या धर्म व जातीविषयी विचारणा केली. त्यावर त्याने आपली आई हिंदू आणि वडील मुस्लिम धर्मीय असल्याचे सांगत आपला धर्म ‘भारतीय’ असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, काळवीट शिकारप्रकरणी त्याची बाजू मांडण्यासाठी सलमानला न्यायालयाने ४ मे रोजीपर्यंतची मुदत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am an indian salman khan
First published on: 30-04-2015 at 06:42 IST