स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रध्वज फडकावण्यास आणि सॅल्यूट करण्यास नकार दिल्याने तामिळनाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्यध्यापिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. तमिळसेल्वी असं या मुख्यध्यापिकेचं नाव असून त्या या वर्षी निवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा – दोन वर्षांनंतर सीएए-एनआरसी कायद्याविरोधात पुन्हा निदर्शने सुरू

मुख्यध्यापिकेने ध्वजारोहण करण्यास नकार दिल्यानंतर शाळेतील सहायक मुख्यध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहण केले.

हेही वाचा – “भारतात येऊन प्रश्न विचारा”, थायलंडमधील भारतीयाला एस जयशंकर यांचं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तमिळसेल्वी यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ”राष्ट्रध्वजाचा अवमान माझा उद्देश नव्हता. मात्र, मी याकोबा ख्रिश्चन आहे. आमच्यात केवळ देवाला सॅल्यूट करण्याची पद्धत आहे. त्यामुळेच मी इतर कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण करण्यास सांगितले”, असे त्या म्हणाल्या.