पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागत असल्याने सत्ताधारी विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. यावेळी काही नेत्यांनी तर विरोधकांना संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे नागरी उड्डाण मंत्री गुलाम खान यांनी तर आत्मघाती हल्लेखोर होऊन सर्व विरोधी पक्षांना उडवून टाकेन असं वक्तव्य केलं असून यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. गुलाम खान यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते म्हणत आहेत की, "आत्मघाती हल्ल्याला इस्लाममध्ये बंदी असली तरी मी हल्लेखोर इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान सरकारला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना उडवून टाकेन". "आत्महत्या हराम आहे, पण माझी इच्छा आहे की आत्मघाती हल्लेखोर होऊन सर्व विरोधकांना उडवून टाकायचं," असं गुलाम खान म्हणत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुढे बोलताना त्यांनी देशाचे आणि धर्माचे सर्व शत्रू ज्या ठिकाणी एकत्र जमले असतील तिथे जाऊन आपल्यासह सर्वांना बॉम्बने उडवून टाकण्याची इच्छा असल्याचंही यावेळी ते म्हणाले. https://twitter.com/fawadrehman/status/1502732128890630147?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1502732128890630147%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.opindia.com%2F2022%2F03%2Fpakistan-minister-ghulam-sarwar-khan-imran-khan-suicide-bomber-blow-opposition%2F इम्रान खान यांनीदेखील अविश्वास प्रस्तावावरुन विरोधकांवर निशाणा साधला असून आपल्याला सत्तेतून खाली खेचण्यासाठी पाश्चिमाच्या देश आणि खासकरुन अमेरिकेसोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोप केला आहे. याआधी त्यांनी आपले १० लाख समर्थक अविश्वास प्रस्तावावरील मतदानाच्या दिवशी डी चौकात एकत्र येतील अशी धमकी विरोधकांना दिली होती.