स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या बिभव कुमार यांनी आज दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता बिभव कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी १५ मे रोजी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांना अटक केली होती. स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. तसेच न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावली होती.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
27 yearold woman raped by minor
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार
High Court ordered fast tracking of Badlapur sexual assault case
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : खटल्याची जलदगतीने सुनावणी घ्या आणि तो लवकरात लवकर निकाली काढा, उच्च न्यायालयाचे आदेश
Jaideep Apte , bail , High Court,
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन
Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…
police detained criminal and beat him on street who threatened to beat journalists
Video : डोंबिवलीत दहशत माजविणाऱ्या भाईला भर रस्त्यात पोलिसांचा चोप
Supriya Sule
Supriya Sule : वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!

हेही वाचा – मारहाणीच्या घटनेनंतर खासदारकीचा राजीनामा देणार का? स्वाती मालीवाल म्हणाल्या, “मी…”

महत्त्वाचे आज झालेल्या सुनावणीदरम्यान स्वाती मालिवाल या स्वत: न्यायालयात उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी बिभव कुमार यांच्या जामिनाला जोरदार विरोध केला. तसेच त्यांना जामीन मंजूर झाल्यास मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे, असा आरोपी त्यांनी केला.

दरम्यान, बिभव कुमार यांच्या वकीलांनीही स्वाती मालिवाल यांचे आरोप फेटाळून लावले. ज्यावेळी स्वाती मालिवाल अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी पोहोचल्या, त्यावेळी बिभव कुमार तिथे उपस्थित नव्हते, असा दावा त्यांनी केला. तसेच कोणतीही परवानगी नसताना स्वाती मालिवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखलही करण्यात आली होती, हे देखील त्यांनी न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिलं.

हेही वाचा – VIDEO : “…तर मी तुझी नोकरी खाईन”; मारहाण होण्यापूर्वी स्वाती मालिवाल यांच्याबरोबर काय घडलं?

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वीय साहायक बिभव कुमार यांनी मला मारहाण केली, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या पथकाने स्वाती मालिवाल यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यावेळी स्वाती मालीवाल यांनी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली होती. तत्पूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमार यांना समन्स बजावले होते. यानुसार बिभव कुमार यांना १७ मे रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांना अटक केली होती. तसेच न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Story img Loader