Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात विद्यार्थी आणि शिक्षिका एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत.

पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायलादेखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Ram jhoola,Rsihikesh a women was beating a man, because he had a fight with her husband video viral
VIDEO: “अशी बायको प्रत्येकाला मिळो” ऋषिकेशला फिरायला गेलेल्या जोडप्यासोबत गैरप्रकार; महिलेनं काय केलं पाहाच
Shocking Video Woman Seen Walking Naked On Busy Street In Broad Daylight In Ghaziabad viral Clip Prompts
धक्कादायक! भररस्त्यात विवस्त्र फिरत होती महिला, Video होतोय Viral
Bailgada sharyat shocking video goes viral on social media Bailgada sharayat permission
VIDEO: “विजय नेहमी शांततेत मिळवायचा” बैलगाडा शर्यतीचा थरार; ओव्हरटेक करीत क्षणात कशी जिंकली शर्यत, एकदा पाहाच
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
a female teacher teach dance to child students on Bumbro Bumbro song
“बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो” शिक्षिकेने शिकवला चिमुकल्यांना सुंदर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”

मागील काही दिवसांपूर्वी एका कॉलेजमधील असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात शिक्षिका ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान, आता एक शिक्षिका विद्यार्थ्यासोबत ‘आशिकी २’ चित्रपटातील गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॉलेजमधील एका वर्गात फेयरवेल पार्टी साजरी केली जात आहे, यावेळी वर्गात सजावटदेखील केल्याचे दिसत आहे. यावेळी एक विद्यार्थी शिक्षिकेसोबत ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. यावेळी वर्गातील इतर विद्यार्थीदेखील या दोघांकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: “भावा जिमचे पैसे दे”; जिममध्ये आलेल्या तरुणाचा माकडाने केला पाठलाग, Viral Video पाहून हसालपोट धरून

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सोशल मीडियावरील @kushal_m.j या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास १४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून सात लाखांहून अधिल लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर युजर्सदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “शाळेचे मुख्याध्यापक कॅमेऱ्यातून पाहत असतील”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “लकी विद्यार्थी, लकी शिक्षिका”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “माझी शाळा अशी का नाही.” तर एका युजरने लिहिलंय की, “आमच्यावेळी अशा शिक्षिका नव्हत्या.” तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “आमचे हे स्वप्न आता स्वप्नच राहणार.”