सहकारी अधिकाऱयाच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर भारतीय हवाई दलातील फ्लाईट लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱयाला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय हवाई दलाच्या कोर्टाने घेतला. ईशांत शर्मा असे बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱयाचे नाव आहे.
शर्मा यांनी त्यांचे हवाई दलातील वरिष्ठ दर्जावरील सहकाऱयाच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप होता. हवाई दलातच स्क्वॉड्रन लीडर म्हणून कार्यरत असलेल्या संबंधित महिलेने गेल्यावर्षी या प्रकरणामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर शर्मा यांची चौकशी करण्यासाठी हवाई दलाच्या कोर्टाची निर्मिती करण्यात आली होती. चौकशीमध्ये शर्मा यांच्याविरोधातील पुरावे सापडल्यामुळे त्यांच्या बडतर्फीची शिफारस हवाई दलाच्या नैऋत्य विभागाने केली. सहकारी अधिकाऱयाच्या पत्नीसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप शर्मा यांच्याविरुद्ध ठेवण्यात आला.