अजिंक्य भारताला अखेर विश्वचषक स्पर्धेत पराभवाचे तोंड पाहावे लागले. लियाम प्लंकेट आणि ख्रिस वोक्स यांनी टिच्चून मारा करत विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला विजयपथावर आणलं आहे. ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ३०६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. इंग्लंडने ३१ धावांनी सामन्यात बाजी मारत उपांत्य फेरीसाठी आपलं आव्हान जिवंत ठेवलं. इंग्लंडचा साखळी फेरीत आता न्यूझीलंडशी सामना होणं बाकी आहे.

WC 2019 : ऋषभ पंत कुठे?; हा घ्या चौथ्या क्रमांकावर – रोहित शर्मा

बांगलादेश, पाकिस्तान आणि इंग्लंड या ३ संघांमध्ये सध्या चौथ्या स्थानासाठी शर्यत दिसून येत आहे. इंग्लंडच्या भारतावरील विजयाचा फटका पाकला बसला आहे. कारण इंग्लंडचा साखळी फेरीत आता न्यूझीलंडशी सामना होणं बाकी आहे. तर पाकचा बांगलादेशशी सामना होणार आहे. पाकला जर उपांत्य फेरी गाठायची असेल, पाकला बांगलादेशला पाणी पाजावे लागेल तसेच इतर संघाच्या सामन्यावरही लक्ष ठेवावे लागेल. पण जर रविवारच्या सामन्यात भारताकडून इंग्लंड पराभूत झाला असता, तर पाकचे उपांत्य फेरीत पोहोचणे सुकर झाले असते. पण भारतीय संघ पराभूत झाला. त्यानंतर पाकच्या चाहत्यांनी आणि इतर माजी खेळाडूंनी भारतावर अखिलाडूवृत्तीचा आरोप केला. त्यातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूचा शोएब अख्तरने भारतीय संघाबाबत एक मत व्यक्त केलं आहे.

WC 2019 : रडीचा डाव खेळून भारत मुद्दाम हरला; वकार युनिस बरळला

“भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात चांगला खेळ करू शकला असता. पहिल्या १० षटकात अत्यंत आक्रमक खेळ करणाऱ्या भारताला ५ गडी हातात असताना खूप उत्तम खेळ करता येऊ शकला असता. मोठा चमत्कार करण्याची भारतीय संघाकडे संधी होती. असो! इंग्लंडने सुंदर खेळ केला. आता न्यूझीलंडकडून उत्तम खेळाची अपेक्षा आहे,” अशा शब्दात अख्तरने नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. लोकेश राहुल एकही धाव न काढता माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. रोहित-विराटची जोडी भारताला विजय मिळवून देईल असं वाटत असतानाच लियाम प्लंकेटने विराटला माघारी धाडलं. त्याने ६६ धावांची खेळी केली. यानंतर रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितने आपलं शतकही पूर्ण केलं. मात्र इतर कोणत्याही खेळाडूने जबाबदारीने खेळ केला नाही. त्यामुळे भारताला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडकडून प्लंकेटने ३ तर वोक्सने २ बळी घेतले. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो याने आक्रमक शतक केले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.