इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला सामना सुरु असताना एक धक्का बसला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना भारताचा सलामीवीर लोकेश राहुल पाठीवर जोरात पडला आणि त्याला दुखापत झाली. प्रथमदर्शनी ही दुखापत फारशी गंभीर नसावी असे वाटले होते, पण या घटनेनंतर दुखापत गंभीर असल्याचे समजले आणि राहुलला मैदानाबाहेर पाठवण्यात आले अन क्षणभर भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पण राहुलला प्रथमोचार देण्यात येत असून तो लवकरच पुनरागमन करेल, असे BCCI ने सांगितले.
इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो हा ४८ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी बेअरस्टोने एक उंच फटका लगावला. हा चेंडू सीमारेषा ओलांडून जाणार की राहुल तो झेल टिपणारी हे चेंडू हवेत असताना काहीच समजू शकले नाही. पण चेंडू जसा सीमारेषेचा जवळ हवेत पोहोचला, तसा राहुलने झेल पकडण्याचा आतोनात प्रयत्न केला. त्याने उंच उडी मारून चेंडू आत रोखायचा प्रयत्न केला, पण त्याला चेंडूचा नीट अंदाज घेता आला नाही. तो झेल टिपण्याचा प्रयत्न करताना तो सीमारेषेबाहेर पाठीवर पडला. त्यावेळी राहुलला दुखापत झाली.
राहुलला झालेली दुखापत फार गंभीर असेल, तर त्याला या सामन्यात फलंदाजीही करता येणार नाही. मात्र BCCI ने दिलेल्या माहितीनुसार राहुलवर उपचार करण्यात येत असून तो लवकरच मैदानात परतणार आहे. त्यामुळे भारतासाठी ही फारशी चिंतेची बाब नाही असे दिसून येत आहे.
BCCI: KL Rahul landed on his back while attempting to take a catch. He is being treated and assessed & is expected to be back. #CWC19 #INDvENG (file pic) pic.twitter.com/rYblwVql3Q
— ANI (@ANI) June 30, 2019
दरम्यान, या सामन्यात इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार दीडशतकी सलामी भागीदारी केली. IPL मध्ये तुफान यशस्वी ठरलेला हैदराबाद संघाचा जॉनी बेअरस्टो याला सूर गवसला. ‘करो या मरो’च्या सामन्यात त्याने ९० चेंडूत तुफानी शतक ठोकले. त्याचा सहकारी सलामीवीर जेसन रॉय यानेही चांगली खेळी करत अर्धशतक केले. पण त्याला बेअरस्टो प्रमाणे अर्धशतकाचे शतकात रूपांतर करता आले नाही. ५७ चेंडूत ६६ धावांची खेळी करून तो माघारी परतला.