गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने २०१९ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात केली. भारताचा संघ २२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. २४० धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव कोलमडला, मात्र रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी सातव्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी रचत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र अखेरच्या षटकात झटपट धावा करणं भारतीय फलंदाजांना जमलं नाही. रविंद्र जाडेजा आणि धोनीच्या मोक्याच्या क्षणी माघारी परतल्यामुळे भारताचा संघ बॅकफूटला ढकलला गेला.

रविंद्र जाडेजाने ७७ तर धोनीने ५० धावा केल्या.  या पराभवासह भारताचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३, मिचेल सँटनरने-ट्रेंट बोल्टने २-२ तर फर्ग्युसन आणि निशमने १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.

पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने अखेरीस २३९ धावांपर्यंत मजल मारली. मंगळवारी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४६.१ षटकांवर थांबवण्यात आला. न्यूझीलंडने मंगळवारी २११ धावांपर्यंत मजल मारली होती. याच धावसंख्येवरुन आजच्या दिवसाचा सुरुवात झाली. न्यूझीलंडचे फलंदाज आजच्या दिवसात फक्त २८ धावांची भर घालू शकले. रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांना झटपट माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. दरम्यान आज दिवसाच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे भारतीय फलंदाज हे आव्हान कसं पूर्ण करतात हे पहावं लागणार आहे. न्यूझीलंडकडून अनुभवी टॉम लॅथमने ७४ धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३ बळी घेतले. त्याला अन्य गोलंदाजांनी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

नाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर मार्टीन गप्टील अवघ्या एका धावेवर माघारी परतला. जसप्रीतच बुमरहाने त्याचा बळी घेतला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोलस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जाडेजाने हेन्री निकोलसचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली. यानंतर मैदानात आलेल्या अनुभवी रॉस टेलरने कर्णधार विल्यमसनच्या साथीने न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. कर्णधार विल्यमसनने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकही झळकावलं. मात्र चहलच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाकडे झेल देत तो माघारी परतला. त्याने ६७ धावांची खेळी केली. विल्यमसन माघारी परतल्यानंतर रॉस टेलरने डावाची सुत्र आपल्या हातात घेतली. जिमी निशम आणि कॉलिन डी-ग्रँडहोमही झटपट माघारी परतले. मात्र टेलरने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं.

Live Blog

19:33 (IST)10 Jul 2019
भारताचा अखेरचा फलंदाज माघारी, विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात

युजवेंद्र चहल निशमच्या गोलंदाजीवर माघारी, न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत दाखल

19:32 (IST)10 Jul 2019
भुवनेश्वर कुमार माघारी, भारताला नववा धक्का

फर्ग्युसनने घेतला बळी

19:32 (IST)10 Jul 2019
महेंद्रसिंह धोनी धावचीत, भारताला आठवा धक्का

मोक्याच्या क्षणी गप्टीलच्या अचूक फेकीवर धोनी धावबाद, भारताच्या आशांवर पाणी

19:13 (IST)10 Jul 2019
मोक्याच्या क्षणी रविंद्र जाडेजा माघारी, भारताला सातवा धक्का

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात धोनी विल्यमसनकडे झेल देत माघारी

18:43 (IST)10 Jul 2019
रविंद्र जाडेजाचं अर्धशतक, सामना रंगतदार अवस्थेत

न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत, जाडेजाने गरजेच्या वेळी फटकेबाजी करत आपलं अर्धशतक झळकावलं आहे.

18:35 (IST)10 Jul 2019
रविंद्र जाडेजा-धोनीची महत्वपूर्ण भागीदारी

सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत धोनी-जाडेजाने भारताच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

17:51 (IST)10 Jul 2019
भारताला सहावा धक्का, हार्दिक पांड्या माघारी

मिचेल सँटरनरच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात हार्दिक पांड्या विल्यमसनच्या हाती झेल देत माघारी

17:22 (IST)10 Jul 2019
भारताची जमलेली जोडी फुटली, ऋषभ पंत माघारी

मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पंत, डी-ग्रँडहोमकडे झेल देऊन माघारी.

पंतची हार्दिक पांड्यासोबत ४७ धावांची भागीदारी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करताना केल्या ३२ धावा

17:08 (IST)10 Jul 2019
हार्दिक पांड्या - ऋषभ पंत जोडीची झुंज सुरुच

पहिले ४ फलंदाज माघारी परतल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत भारतीय डावाला आकार देण्याचं काम केलं आहे.

16:21 (IST)10 Jul 2019
हेन्रीचा भेदक मारा, दिनेश कार्तिकही माघारी

जिमी निशमने घेतला कार्तिकचा झेल, भारताला चौथा धक्का

15:50 (IST)10 Jul 2019
भारताला तिसरा धक्का, लोकेश राहुल माघारी

मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर राहुल झेलबाद, भारतीय संघ अडचणीत

15:48 (IST)10 Jul 2019
भारताला आणखी एक मोठा धक्का, विराट कोहली माघारी

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर विराट कोहली पायचीत, भारताचा महत्वाचा फलंदाज माघारी परतला

15:41 (IST)10 Jul 2019
भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा माघारी

मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर रोहित झेलबाद, भारताचा पहिला गडी माघारी परतला

15:27 (IST)10 Jul 2019
न्यूझीलंडची दुसऱ्या दिवशी २३९ धावांपर्यंत मजल

भारताला विजयासाठी २४० धावांचं आव्हान

15:16 (IST)10 Jul 2019
न्यूझीलंडला आठवा धक्का, मॅट हेन्री माघारी

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात हेन्री माघारी

15:11 (IST)10 Jul 2019
न्यूझीलंडला दोन धक्के, टेलर-लॅथम माघारी

चोरटी धाव घेताना टेलर रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर धावबाद

तर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात लॅथम झेलबाद. न्यूझीलंडचे सात गडी माघारी

14:59 (IST)10 Jul 2019
आनंदाची बातमी, सामन्याला सुरुवात

दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात दाखल

14:59 (IST)10 Jul 2019
आनंदाची बातमी, सामन्याला सुरुवात

दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात दाखल

14:28 (IST)10 Jul 2019
भारतीय खेळाडू सामना सुरु होण्याआधी सराव करताना
14:26 (IST)10 Jul 2019
पावसाचं वातावरण पाहता चहल, दिग्गज खेळाडुकडून टिप्स घेताना...
14:24 (IST)10 Jul 2019
आजच्या दिवशी सामना होण्याची शक्यता वाढली, मात्र पावसाचं सावट अद्यापही कायम

मँचेस्टरमध्ये आता पावसाने उसंत घेतली असली तरीही, उत्तरार्धात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्यापही मँचेस्टरमधलं वातावरण ढगाळ आहे