विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात विंडीजच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या फलंदाजांची भंबेरी उडाली, पण ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी जोरदार तडाखा देत विंडीजला २८९ धावांचे आव्हान दिले. ५ बाद ७९ धावा अशी अवस्था असताना नॅथन कुल्टर-नाईल (९२), स्टीव्ह स्मिथ (७३) आणि ऍलेक्स कॅरी (४५) या तिघांनी धमाकेदार खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला २८८ धावांपर्यंत मजल मारून दिली.

या सामन्यात नॅथन कुल्टर-नाईलने तुफान फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या बळावर त्याने ६० चेंडूत ९२ धावा केल्या. त्यात त्याने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. हे त्याचे वन डे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठरले. या अर्धशतकाबरोबरच त्याने विश्वचषक स्पर्धेतील इतिहास रचला. ८व्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. याआधी २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत झिम्बाबवेच्या हिथ स्ट्रीकने न्यूझीलंड विरुद्ध ८४ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी केली होती. तो विक्रम कुल्टर-नाईलने मोडीत काढला.

दरम्यान, विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. १५ या धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला पहिला गडी गमवावा लागला. थॉमसने फिंचला ६ धावांवर माघारी धाडले. पाठोपाठ डेव्हिड वॉर्नरला कॉट्रेलने तंबूचारस्ता दाखवला. वॉर्नरला केवळ ३ धावा करता आल्या. त्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न आंद्रे रसलने हाणून पाडला. बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर फटका खेळण्याचा मोह ख्वाजाला आवरला नाही. त्याने फटका खेळला. पण त्याच्या बॅटची कड लागून चेंडू यष्टिरक्षकाकडे गेला. यष्टीरक्षक शाय होप याने अप्रतिम उडी मारून त्याचा झेल टिपला. ख्वाजा १९ चेंडूत २ चौकरांसह १३ धावा केल्या. त्यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेलही २ चेंडू खेळून बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था डावाच्या सुरूवातीला ४ बाद ३८ अशी झाली होती. स्टॉयनीसदेखील १९ धावांवर माघारी परतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर मात्र स्टीव्हन स्मिथ आणि नॅथन कुल्टर-नाईल या दोघांनी दमदार फलंदाजी केली. या दोघांनी १०२ धावांची भागीदारी केली. स्मिथ बाद झाला, तरीही कुल्टर-नाईलने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने ६० चेंडूत ९२ धावा केल्या. त्यात त्याने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. स्टीव्हन स्मिथने ७३ धावा केल्या. तर कॅरीने ४५ धावा केल्या.