‘द न्यू यॉर्क टाइम्स’चे वृत्त

करोना विषाणूच्या प्रसाराबाबत काही धोका नसल्याचे चित्र निर्माण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीनुसार भारतीय वैद्यक परिषदेने (आयसीएमआर) सरकारला अनुकूल असे निष्कर्ष असलेला अहवाल सादर केला असल्याचे ‘द

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे. करोना विषयीची परिस्थिती फारशी गंभीर नसल्याचे भ्रामक चित्र निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न यातून उघड झाला आहे.

‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने आयसीएमआरने सरकारला अनुकूल असे निष्कर्ष काढून दिल्याबाबत पुरावे सादर केले  आहेत. त्यामुळे करोना काळात विज्ञान व पुरावे यावर राजकीय उद्दिष्टांनी मात केल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाची साथ सुरू झाल्यानंतरच्या काळात आयसीएमआरवर अनेक चुकीची पावले टाकल्याबद्दल टीका झाली होती. जुलै २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संपादकीयमध्ये द वायरने म्हटले होते की, आज आयसीएमआर सरकारच्या करोना प्रतिबंधक धोरणावर प्रतिकूल मत व्यक्त करील, अशी परिस्थिती नाही. आता द न्यू यार्क टाइम्सच्या वृत्ताने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आयसीएमआरचे वैज्ञानिक अनूप अग्रवाल यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये राजीनामा दिला होता. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी करोनाच्या प्रसाराचा अंदाज घेण्यासाठी गणिती प्रारूपाबाबत शंका व्यक्त केली तेव्हा ही तुमच्या अखत्यारीतील बाब नाही असे सांगून आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी त्यांना गप्प केले होते. गणितीय प्रारूप वा सुपरमॉडेलची निर्मिती ऑक्टोबर २०२० मध्ये आयसीएमआरच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. तज्ज्ञांनी या प्रकाराबाबत शंका व्यक्त केली होती, तरी आयसीएमआरने मोदी यांची मर्जी राखण्यासाठी व अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने सुरू करण्यासाठी या प्रारूपाचा मुद्दा पुढे नेला. त्यानंतर बिहारमध्ये निवडणूक प्रचारही जोरात करण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सुपरमॉडेलमधील निष्कर्षांवर शिक्कामोर्तब केले होते.

करोनावरचे राजकारण २०२० मध्येच सुरू झाले होते. त्यात गेल्या वर्षीच्या सुरुवातीला तबलिगी जमातीच्या मेळाव्यामुळे करोना पसरला असा धार्मिक रंग देण्यात आला होता. तबलिगी जमातीच्या मेळाव्यामुळे करोना पसरल्याच्या कारणमीमांसेला आयसीएमआरने पाठिंबा दिला होता. आयसीएमआरचे तत्कालीन मुख्य वैज्ञानिक रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की, त्यांनी मुस्लिमांवर आगपाखड करून त्यांना लक्ष्य करण्याच्या मुद्द्यावर संताप व्यक्त केला होता. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही असे सांगून गप्प बसवले.

करोना साथ आटोक्यात येत असल्याच्या सरकारच्या आशावादाला खतपाणी घालणारे मुद्दे आयसीएमआरने पुढे आणल्याची तीन उदाहरणे या बातमीत देण्यात आली आहेत. जून २०२० मध्ये आयसीएमआरच्या अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला की, टाळेबंदीने शिखरावस्था टाळता आली नाही तरी ती लांबवता आली पण काही काळातच हा अभ्यास मागे घेण्यात आला. आयसीएमआरने ट्विटमध्ये असे म्हटले होते की, सदर अभ्यासाचे अवलोकन झालेले नसून ती आयसीएमआरची अधिकृत भूमिका नाही. द न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, या अभ्यासाच्या एका लेखकाने संस्थेतील धुरिणांच्या दबावामुळे शोधनिबंध मागे घेतला. आमची परवानगी न घेता हा शोध निबंध प्रकाशित झालाच कसा, असा आक्षेप संस्थेने घेतला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icmr government friendly findings akp
First published on: 16-09-2021 at 01:09 IST