करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ७६ टक्के नागरिकांमध्ये करोना संसर्गाचे प्रकरणे आढळले आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) लसीकरण आणि करोना संसर्गासंबंधी प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात ही माहिती देण्यात आली. अहवालानुसार, यापैकी संक्रमित लोकांमध्ये १७ टक्के रुग्णांना कोणतेही लक्षणे नव्हती होते, तर १० टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या २७ पैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आयसीएमआरच्या या आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की लस करोनाविरूद्ध लढण्यासाठी खूप प्रभावी आहे.

हेही वाचा- उत्परिवर्तीत डेल्टा उपप्रकार प्रबळ ठरण्याची शक्यता

१ मार्च ते १० जून या काळात ओडिशाच्या वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांमधून ३६१ लोकांचे नमुने घेण्यात आले. यापैकी बहुतेक प्रकरणे अशी होती ज्यांनी करोनाचे दोन्ही डोस घेतले होते. भुवनेश्वर येथील आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या या नमुन्यांपैकी २७४ जणांचा करोना अहवाल पॉझीटिव्ह आले.

अहवालानुसार या २४७ करोना संक्रमित लोकांपैकी १२.८ टक्के लोकांनी कोव्हॅसिन आणि ८७.२ टक्के लोकांनी कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर संसर्ग झालेल्यांपैकी ४३ टक्के हेल्थकेअर कर्मचारी होते जे देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी रुग्णालयात विशेषत: कोविड वॉर्डमध्ये ड्यूटीवर होते. तसेच कोविशील्ड घेतल्यानंतर अशा प्रकारच्या आरोग्य सेवेतील १० टक्के लोक संसर्गित असल्याचे आढळले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If corona occurs even after vaccination less likely to be hospitalized srk
First published on: 25-06-2021 at 09:38 IST