Mithun Chakraborty Slams Bilawal Bhutto Zardari: ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी मंगळवारी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी सिंधू जल कराराच्या स्थगितीवरून भारताला दिलेल्या इशाऱ्यावर टीका केली आहे. कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “जर अशी विधाने करत राहिला आणि आमचा संयम सुटला, तर एकामागून एक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली जातील.”

व्यंग्यात्मक टिप्पणी करताना, भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती पुढे म्हणाले, “आम्ही असे धरण बांधण्याचा विचार करत आहोत जिथे १४० कोटी लोक लघुशंका करतील. त्यानंतर, आम्ही धरण उघडू आणि त्सुनामी येईल. माझी ही भूमिका पाकिस्तानी नागरिकांविरोधात नाही. मी हे सर्व त्यांच्यासाठी (बिलावल भुट्टो) सांगतो आहे.”

लष्करी संघर्षात भारताचा…

सिंध सरकारच्या संस्कृती विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बिलावल भुट्टो यांनी भारताला इशारा दिला होता. त्यांनी सिंधू नदीचे पाणी वळवणे हा पाकिस्तानच्या इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेवर”, विशेषतः सिंधवर हल्ला असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी भुट्टो यांच्यावर टीका केली आहे.

बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंधू नदीवरील पणी प्रकल्प हा पाकिस्तानच्या जल सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचा आरोप केला. तसेच भुट्टोंनी मे महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचा पराभव झाल्याचा दावाही केला.

यापूर्वीही भुट्टो बरळले

बिलावल भुट्टो यांनी अशा प्रकारचे इशारे देण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. जूनमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या संसदेत म्हटले होते की, जर सिंधू नदीच्या पाण्याचा वाटा नाकारला तर पाकिस्तान भारताशी “युद्ध करेल”.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, एप्रिलमध्ये भारताने १९६० चा सिंधू जल करार स्थगित केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या करारावरी स्थगिती कधीही उठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानी लष्करप्रमुखांची धमकी

तत्पूर्वी, अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काल भारताला अणू हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले होते की, “संकट उद्भवल्यास पाकिस्तान आपल्या अणुशस्त्रांचा वापर करतील आणि जर भारताने पाकिस्तानकडे येणारे पाणी वळवले तर ते भारतीय पायाभूत सुविधा नष्ट करतील.”

Live Updates