करोनाचा संसर्ग कमी झान्याने देशातील सर्वच निर्बंध उठवण्यात आले आहे, त्यामुळे जनजीवन हे सुरळीत सुरु झाले आहे. रेल्वे सेवा-हवाई सेवा ही नेहमीप्रमाणे सुरु असून देशात विविध ठिकाणी पर्यटनाचे प्रमाणही वाढले आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असल्याने देशात करोना बांधितांचा आकडा तर गेले काही दिवस हा दोन हजारच्या खाली होता. काही राज्यांनी तर मास्क सक्ती ही रद्द केली आहे.

असं असतांना तामिळनाडू राज्यात आरोग्य विभाग काहीसा चिंतेत आहे. कारण आयआयटी-मद्रास ( IIT-Madras )मधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करोना बाधित झाले असल्याचं समोर आलं आहे. १९ एप्रिलला करोना संसर्ग झाल्याचं दिसून आल्यावर आयआयटी-मद्रासच्या संकुलातील करोना चाचण्या घेण्यात आल्या. तेव्हा १२ विद्यार्थी करोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा निर्जंतुकीकरण, करोना चाचण्या वगैरे खबरदारीचे उपाय हे मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले. तेव्हा आता यामध्ये आणखी १८ विद्यार्थ्यांची भर पडली आहे. त्यामुळे आयआयटी-मद्रासच्या संकुलातील करोना बाधित विद्यार्थ्यांचा आकडा हा आता ३० वर पोहचला आहे. तेव्हा आणखी करोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी आणखी उपाययोजना आरोग्य विभागाकडून अंमलात आणल्या जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआयटी-मद्रासच्या संकुलातील परिस्थिती काहीशी गंभीर एकीकडे असतांना देशातही काही प्रमाणात करोना बाधितांचे प्रमाण हे गेल्या २४ तासात वाढलेले बघायला मिळाले. गेल्या २४ तासात दोन हजार ४५१ नव्या करोना बाधितांची नोंद करण्यात आली. देशात सध्या एकूण १४ हजारपेक्षा जास्त रुग्ण करोना बाधित असून ते उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत एकु पाच लाख २ हजार ११६ लोकांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे.