गीता गोपीनाथ लवकरच सोडणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञाचे पद; जाणून घ्या कारण?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये या पदावर पोहोचणाऱ्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत

Imf chief economist gita gopinath leave job return Harvard university

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ जानेवारीमध्ये राजीनामा देणार आहेत. भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ जानेवारी २०१९मध्ये आयएमएफसोबत जोडल्या गेल्या होत्या. यानंतर आता पुन्हा त्या प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात परतत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी ही माहिती दिली.

आयएमएफने एका निवेदनात म्हटले आहे की, हार्वर्डने गीता गोपीनाथ यांची रजा एक वर्षाने वाढवली होती, ज्यामुळे त्यांना तीन वर्षांसाठी आयएमएफमध्ये सेवा करण्याची परवानगी मिळाली. गोपीनाथ या आयएमएफच्या संशोधन विभागाच्या प्रमुख आहेत, जे जीडीपी वाढीच्या अंदाजासह त्रैमासिक जागतिक आर्थिक दृष्टीकोन अहवाल तयार करतात.

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी गोपीनाथ यांचे कौतुक केले आहे आणि सांगितले की त्यांनी कोविड महामारी दरम्यान महत्त्वपूर्ण विश्लेषणाचे काम केले आहे. क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी असेही म्हटले की गोपीनाथ यांनी आयएमएफच्या सर्वोच्च अर्थतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून इतिहास घडवला आहे.

४९ वर्षीय गीता गोपीनाथ या आयएमएफमध्ये सामील होण्यापूर्वी हार्वर्ड विद्यापीठात जॉन झ्वान्स्त्र आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. हार्वर्डने गोपीनाथ यांच्या अनुपस्थितीची रजा एक वर्ष वाढवून त्याला तीन वर्षे आयएमएफमध्ये सेवा करण्याची परवानगी दिली होती. म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गीता या आयएमएफच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत.

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी सांगितले की गीता यांच्या उत्तराधिकारीचा शोध लवकरच सुरू केला जाईल. जॉर्जिएवा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की गीता यांचे योगदान खरोखर उल्लेखनीय आहे. आंतरराष्ट्रीय वित्त आणि मॅक्रोइकॉनॉमिक्सच्या त्याच्या सखोल आकलनाचा आम्हाला खूप फायदा झाला.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये या पदावर पोहोचणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय आहेत. यापूर्वी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे पद सांभाळत आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या कार्नेगी कॉर्पोरेशनने गीता यांचा सन्मान केला. अमेरिकन समाज आणि लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्याच्या योगदानासाठी आणि कृत्यांसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.

मैसूरमध्ये जन्म झालेल्या गोपीनाथ हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर होत्या. तसेच त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत होत्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं एक ऑक्टोबर रोजी त्यांची नियुक्ती जाहीर करताना गीता गोपीनाथ या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या अर्थतज्ज्ञ असल्याचे व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड अनुभव असल्याचे गौरवोद्गार काढले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये त्यांनी चांगले नेतृत्वगुण दाखवले असून त्या जगभरातील महिलांसाठीही एक आदर्श असल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Imf chief economist gita gopinath leave job return harvard university abn

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या