पीटीआय, हैदराबाद

तेलंगणामध्ये सत्ताधारी बीआरएसचे खासदार आणि सध्याचे उमेदवार के प्रभाकर रेड्डी यांच्यावर सोमवारी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये त्यांच्या पोटाला जखम झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हल्लेखोरालाही ताब्यात घेण्यात आले.

Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
pm narendra modi speaks to sandeshkhali rekha patra
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील रेखा पात्रा यांना भाजपाची उमेदवारी; पंतप्रधान मोदी फोन करत म्हणाले, “शक्ती स्वरूप…”

के प्रभाकर रेड्डी हे मेदक मतदारसंघातील खासदार आहेत आणि विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना दुब्बाक मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ते दौलताबाद मंडल येथे प्रचार करत असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. स्थानिकांनी हल्लेखोराला मारहाण केल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.