आशियातील पहिला आणि जगातील पाचवा सर्वात मोठा हाय स्पीड टेस्टिंग ट्रॅक (NATRAX) वाहनांच्या चाचणीसाठी तयार आहे. काल (मंगळवार) केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मध्य प्रदेशातील पिथमपुरात नॅट्रॅक्स येथे बांधल्या गेलेल्या ११.३ किमी लांबीच्या या ट्रॅकचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हे देखील उपस्थित होते. या जागतिक दर्जाच्या चाचणी ट्रॅकवर सर्व प्रकारच्या वाहनांची चाचणी घेतली जाऊ शकते. ३ हजार एकर जागेवर हा ट्रॅक तयार करण्यात आला आहे.
उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी अशी आशा व्यक्त केली की अशा सुविधांमुळे आगामी काळात देश ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येईल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जाणारे हे एक सशक्त पाऊल आहे.
High-Speed Track is the heart of any proving ground for the auto sector. Today, inaugurated the longest high-speed track in Asia at Indore.
A proud moment for India and a key initiative in realising PM Shri @narendramodi ‘s vision of #AatmaNirbharBharat pic.twitter.com/lTnaz0ppQv
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) June 29, 2021
हेही वाचा- १० लाखांच्या आतील ऑटोमॅटिक कार
ट्रॅकची लांबी ११.३ किमी आहे आणि रुंदी १६ मीटर
नॅट्रेक्स हाय स्पीड ट्रॅकची लांबी ११.३ किमी आहे आणि रुंदी १६ मीटर आहे. ट्रॅक जास्तीत जास्त २५० किमी प्रतितास वेगासाठी डिझाइन केला गेला आहे. या ट्रॅकवर उच्चस्तरीय कारची अधिकतम वेग क्षमता देखील तपासली जाऊ शकते. आतापर्यंत हे कोणत्याही भारतीय चाचणी ट्रॅकवर मोजले जाऊ शकत नव्हते. ट्रॅकमुळे दुचाकी, तीन चाकी वाहने, लहान मोटारी, लक्झरी कार, बसेस, ट्रक आणि ट्रॅक्टर पर्यंतच्या विविध प्रकारच्या वाहनांची चाचणी केली जाऊ शकते.