Maharashtra News Updates : भारत आज आपला ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. राजधानी दिल्ली ते देशाच्या प्रत्येक हा दिवस साजरा केला जात आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यांनंतर पंतप्रधान देशाला संबोधित करत आहेत. मोदींनी लागोपाठ १२व्या वेळा तिरंगा झेंडा फडकवला. असे करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनले आहेत.

Live Updates
19:23 (IST) 15 Aug 2025

मुंबई महापालिकेचे अभियंते पदोन्नतीपासून वंचित, दुय्यम अभियंत्यांची पदे बाहेरून भरणार

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. ...सविस्तर वाचा
19:23 (IST) 15 Aug 2025

मुंबई : विसर्जित गणेशमूर्ती २४ तासच पाण्यात, पीओपी गणेशमूर्ती पुनर्प्रक्रियेसाठी पाठवणार

मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात दिलेले आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. ...वाचा सविस्तर
19:00 (IST) 15 Aug 2025

गोरेगाव - बोरिवलीदरम्यान जलद लोकल धावणार नाही

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी शनिवारी रात्रकालीन मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. ...वाचा सविस्तर
19:00 (IST) 15 Aug 2025

मुंबई : कल्याण-कसारादरम्यान ब्लॉक

या ब्लाॅकमुळे शनिवारी रात्री सीएसएमटी - कसारा लोकल आणि रविवारी पहाटे कसारा - सीएसएमटी लोकल विलंबाने धावतील. ...वाचा सविस्तर
18:22 (IST) 15 Aug 2025

मुंबई : जखमी गोविंदावर उपचार करण्यासाठी रुग्णालये सज्ज

गोपाळकाल्यानिमित्त मुंबई-ठाण्यासह अन्य भागांमध्ये शनिवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...अधिक वाचा
17:54 (IST) 15 Aug 2025

…तर अशा मुलींचाही वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार, उच्च न्यायालयाचा तीन बहिणींना दिलासा

याचिकाकर्त्यांपैकी एकीच्या पतीचे निधन झाल्याने ती माहेरी आली होती, तर उर्वरित दोघी पतीने त्याग केल्याने आधीपासूनच वडिलांच्या घरी परतल्या होत्या. ...सविस्तर बातमी
17:06 (IST) 15 Aug 2025

मुंबई : अभियांत्रिकीच्या दुसऱ्या फेरीत केवळ १८ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश, पहिल्या फेरीच्या तुलनेत प्रवेशात घट

पहिल्या फेरीसाठी १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. ...वाचा सविस्तर
17:01 (IST) 15 Aug 2025

तीव्र वास क्षमतेचे बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वानपथक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल

देशभरातील ८ राज्यांमधून (अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र) एकूण १४ श्वान या प्रशिक्षणात ट्राफिक इंडिया मार्फत देण्यात आले होते. ...सविस्तर बातमी
16:58 (IST) 15 Aug 2025

पोलीस, सरकारी कर्मचारी ‘झोपडीवासीय’? बायोमेट्रीक तपासणीत अडथळा

प्राधिकरणाकडून आतापर्यंत ४० टक्के बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित ६० टक्के पूर्ण करण्यासाठी एकाचवेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ...सविस्तर बातमी
16:34 (IST) 15 Aug 2025

मुंबई : २३ व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या, ओबेरॉय संकुलातील चौथी आत्महत्या

एका नामांकीत महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत असलेली १७ वर्षांची तरूणी गोरेगावमधील २३ मजली ओबेरॉय स्क्वेअर इमारतीत वास्तव्यास होती. ...वाचा सविस्तर
16:34 (IST) 15 Aug 2025

आंबा घाटात दरड कोसळली; वाहतुकीला फटका

या मार्गावर दरड कोसळल्या नंतर काही वेळानंतर एक बाजू मोकळी करुन ठप्प झालेली वाहतूक एक मार्गी सुरु करण्यात संबंधित यंत्रणेला यश आले. ...सविस्तर वाचा
16:29 (IST) 15 Aug 2025

हिंदू खाटीक संघटनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचे अभिनंदन

हिंदू खाटीक संघटनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचे अभिनंदन करण्यात आले. आमच्या आंदोलनाला आव्हाड यांनी पाठिंबा दिला आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत, असे हिंदू खाटीक संघटनेचे पदाधिकारी समीर मानकर यांनी सांगितले.

16:26 (IST) 15 Aug 2025

सवलती देऊनही १० वर्षांत घरांच्या किंमती कमी झाल्या नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून विकासकांची कानउघाडणी

मुंबई महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) क्रेडाय-एमसीएचआयकडून नवीन समिती नियुक्त करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
16:24 (IST) 15 Aug 2025

दापोलीत ५.४५ कोटींची व्हेलची वांती जप्त; कस्टम विभागाची मोठी कारवाई

जप्त करण्यात आलेल्या या पदार्थाचे वजन ४ किलो १४० ग्रॅम असून, त्याची राखाडी बाजारातील किंमत सुमारे ५ कोटी ४५ लाख रुपये इतकी आहे. ...सविस्तर बातमी
16:20 (IST) 15 Aug 2025

मुंब्रा रेल्वे स्थानकात १५ डबा लोकलच्या थांब्यासाठी एक ते तीन फलाटांचा विस्तार

कल्याणकडून सीएसएमटीकडे धावणाऱ्या पंधरा डब्याच्या लोकलना मुंब्रा स्थानकात थांबा दिला तर या स्थानकातील प्रवाशांची घुसमट थांबणार आहे. हा विचार करून रेल्वे प्रशासनाने मुंब्रा स्थानकात कळवा बाजुने विस्तारिकरणाचे काम हाती घेतले आहे. ...सविस्तर बातमी
16:11 (IST) 15 Aug 2025

आपल्या शहिद मुलाच्या स्मारकासाठी ते १९ वर्षे लढले; अखेर स्मारकाला मिळाली अधिकृतता, स्वातंत्र्यदिनी पालकांचे स्वप्न पूर्ण

अंबरनाथ पूर्वेतील मोतीराम पार्क परिसरात स्वातंत्र्यदिनी मेजर वीर शौर्य चक्रवर्ती यांचे लहानसे स्मारक उभारून त्या रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा सोहळा शुक्रवारी पार पडला. ...वाचा सविस्तर
15:30 (IST) 15 Aug 2025

गडकरी रंगायतन शिवाय ठाण्याला शोभा नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतनची तिसरी घंटा वाजली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नूतन वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. ...वाचा सविस्तर
15:14 (IST) 15 Aug 2025

घरगुती गॅस सिलिंडरचा वापर प्रवाशी रिक्षांसाठी; कराड, मलकापूर शहरांसह लगतच्या परिसरात छापे; ११ जणांविरुद्ध गुन्हे

कराड, बनवडी, मलकापूर येथील या छाप्यांमध्ये एकूण ७६ सिलिंडरच्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर, ११ जणांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...सविस्तर वाचा
15:03 (IST) 15 Aug 2025

धुळ्याच्या पालकमंत्री पदावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर पालकमंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया

काल नाशिक येथे प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की धुळ्याचे पालकमंत्री पद मला देण्यासाठी सांगितले होते मात्र मी तेव्हाही स्पष्ट बोललो होतो की देणार ते नाशिकला द्या नाहीतर मला धुळ्याला नको आणि कुठेही नको अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आज राज्याची पणन तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले आहे. छगन भुजबळ हे महाराष्ट्र आणि महायुतीचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून नेमका हा विषय काय आहे हे समजून घेऊ अशी सावध प्रतिक्रिया धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केली.

14:19 (IST) 15 Aug 2025

कराडजवळ बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

नडशी गाव आणि एकूणच परिसरात बिबट्याचे वारंवार हल्ले होत असून, चारच दिवसांपूर्वी मयूर गुजर यांच्या आणि पंधरा दिवसांपूर्वी समाधान माने यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला होता. ...अधिक वाचा
13:54 (IST) 15 Aug 2025

मनोज जरांगे यांच्या कायद्यात बसणाऱ्या मागण्यांना माझे समर्थन; पंकजा मुंडेंनी केलं स्पष्ट

मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतील त्यांना माझं समर्थन असल्याचे जालनाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांचे मी वेळोवेळी समर्थन केले असल्याचेही पंकजा यांनी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान मुंबईतील नागरीक आणि आंदोलक दोघांनाही त्रास होणार नाही, असं प्रशासनाचे नियोजन असेल, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात दोषींवर गुन्हे दाखल होणारच असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले आहे.

12:31 (IST) 15 Aug 2025

" स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांची ऐतिहासिक भेट!", फडणवीसांनी मानले आभार

"पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज पासून लागू केलेली ₹1 लाख कोटींची 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरेल. यामार्फत देशातील 3.5 कोटींहून अधिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, खासगी क्षेत्रामध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्या मुला-मुलींना सरकारतर्फे ₹15,000 दिले जातील. या महत्त्वाकांक्षी आणि दूरदर्शी योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार!" अशी पोस्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

11:52 (IST) 15 Aug 2025

‘लोकभाषे’तूनच शिकवा... ज्येष्ठ भाषा अभ्यासकाची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते डॉ. रमेश वरखेडे यांना ‘गं. ना. जोगळेकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ...अधिक वाचा
11:52 (IST) 15 Aug 2025
लाल किल्ल्ल्यावर पार पडला स्वतंत्र्यदिन सोहळा; पंतप्रधान मोदींनी शेअर केले खास फोटो

पंतप्रधान मोदींनी एक्सवर लाल किल्ल्यावरील स्वतंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

11:26 (IST) 15 Aug 2025

सरकार लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप

कबुतरांच्या नावाखाली राजकारण करताना मंगलप्रभात लोढा यांनी ते राज्याचे मंत्री आहेत, एका समाजाचे मंत्री नाहीत याचे भान ठेवावे असा इशाराही त्यांनी दिला. ...सविस्तर वाचा
10:55 (IST) 15 Aug 2025

PM Modi : 'दाम कम, दम ज्यादा'; अमेरिकेबरोबरच्या 'टॅरिफ वॉर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य

स्वतंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ला येथे केलेल्या भाषणात महत्त्वाचा संदेश दिला आहे. ...वाचा सविस्तर
09:51 (IST) 15 Aug 2025

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार, केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा

PM Vikasit Bharat Rojgar Yojana : खासगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना सरकारकडून १५,००० रुपये दिले जातील, अशी घोषणा देखील मोदी यांनी यावेळी केली. ...अधिक वाचा
09:31 (IST) 15 Aug 2025
हाय पॉवर डेमोग्राफी मिशन सुरू केले जाईल- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी देशात घुसखोरी करणाऱ्यांच्या संकटाबद्दल म्हणाले की, सीमेलगतच्या भागात डेमोग्राफी बदलत आह. आम्ही आपल्या देशात घुसखोरांनाच्या हवाली करू शकत नाहीत. घुसखोर आदिवासी यांना फसवतात. ते आदिवासींचा रोजगार हिसकावून घेत आहेत. मी देशाला या आव्हानाबद्दल सांगू इच्छितो. आण्ही यासाठी हाय पॉवर डेमोग्राफी मिशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

09:19 (IST) 15 Aug 2025
पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरून देशवासीयांसाठी दोन मोठ्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतंत्रता दिवसाच्या निमित्ताने लाल किल्ला येथून दिलेल्या भाषणात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. पीएम मोदी म्हणाले की या दिवाळीला सरकार जीएसटी रिफॉर्म्स घेऊन येईल. यामुळे लोकांना करांमध्ये दिलासा मिळेल. याबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत रोजगार योजना लागू करण्याची घोषणा देखील केली. या योजनेअंतर्गत प्रायव्हेट सेक्टरमध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून १५००० रुपये दिले जातील. त्या कंपन्यांना देखील सरकार प्रोत्साहन देईल. या योजनेमुळे ३.५ कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

09:13 (IST) 15 Aug 2025
२०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वांच्या स्थळांना सुरक्षा कवच देणार - पंतप्रधान मोदीं

देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्याला अपग्रेड होण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या १० वर्षात म्हणजेच २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वपूर्ण स्थळे ज्यामध्ये सामरिक ठिकाणांसह सिव्हीलीयन स्थळे जसे की रुग्णालये, रेल्वे, आस्थेची ठिकाणी यांना तंत्रज्ञानाच्या नव्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने सुरक्षेचे कवच दिले जाईल. देशाच्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटले पाहेज. कोणतेही तंत्रज्ञान असले तरी आपले तंत्रज्ञान त्यापेक्षा सरस ठरले पाहिजे. २०३५ प्रर्यंत मी राष्ट्रीय सुरक्षा कवचचा विस्तार करू इच्छितो, त्याला अधूनिक बनवू इच्छितो. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेत, त्यांच्या सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे. देश मिशन सुदर्शन चक्र लाँच करेल.

हे सुदर्शन चक्र पॉवरफुल वेपन सिस्टम असेल, जे शत्रूचे हल्ले नष्ट तर करेलच याबरोबरच अनेक पटीने शत्रूंवर वार देखील करेल. आम्ही सुदर्शन चक्र मिशनला पुढील दहा वर्षात वेगाने पुढे घेऊन जाऊ. - पंतप्रधान मोदी