BrahMos Missile: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यानंतर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने सीमेवरील काही शहरांवर हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले.

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी भारत-पाकिस्तानमधील लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक स्तरावरील चर्चेनंतर, दोन्ही देशांनी शस्त्रविरामास सहमती दर्शविली होती. काल सकाळी पाकिस्तानी सैन्य भारतीय नागरिक आणि लष्करी तळांना सतत लक्ष्य करत होते. प्रत्युत्तराच्या हल्ल्यात, भारतीय सशस्त्र दलांनी त्यांच्या शस्त्रागारात उपलब्ध असलेल्या अधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्रे आणि आत्मघाती ड्रोन्स यासारख्या शस्त्रांचा वापर केला आहे.

यावेळी रफीकी, मुरीद, नूर खान, रहीम यार खान, सुक्कूर आणि चुनियान येथील पाकिस्तानी हवाई तळ भारतीय लष्कराचे लक्ष्य होते. भारतीय हल्ल्यांमध्ये या सर्व हवाई तळांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय स्कार्दू, भोलारी, जेकबाबाद आणि सरगोधा या विमानतळांचेही मोठे नुकसान झाले. याशिवाय, पसरूर आणि सियालकोट येथील रडार साइट्सना अचूक शस्त्रास्त्रांचा वापर करून लक्ष्य करण्यात आले.

कोणत्या शस्त्रांचा वापर?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय लष्कराच्या या हल्ल्यांमध्ये हवेतून सोडले जाणारे अचूक शस्त्रे जसे की, हॅमर (हायली अ‍ॅजाइल मॉड्यूलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज), हवेतून जमिनीवर मारा करणारे अचूक मार्गदर्शित शस्त्र, SCALP, हवेतून सोडले जाणारे क्रूझ क्षेपणास्त्र आणि ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रचा वापर झाल्याची शक्यता आहे.

या हल्ल्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण, जर वापर झाला असेल तर ब्रह्मोस प्रत्यक्ष लढाईतील हा पहिलाच वापर ठरेल. हॅमर प्रेसिजन-गाइडेड म्युनिशन आणि स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्रे भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांमधून डागता येतात.

लक्ष्यांची अतिशय काळजीपूर्वक निवड

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्यांची निवड अतिशय काळजीपूर्वक करण्यात आली होती. कारण भारतीय लष्कराने केवळ पाकिस्तानी तांत्रिक पायाभूत सुविधा, कमांड अँड कंट्रोल सेंटर, रडार साइट्स आणि शस्त्रास्त्र आगारांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता. स्कार्दू येथील पाकिस्तान हवाई दलाचा हवाई तळ उत्तरेकडील स्थानामुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे आणि भोलारी हवाई तळावर एक लढाऊ स्क्वॉड्रन आणि प्रशिक्षण सुविधा देखील आहे. या दोन्ही गोष्टींचे भारताकडूनही मोठे नुकसान झाले.

तांत्रिक पायाभूत सुविधा, कमांड अँड कंट्रोल सेंटर, रडार साइट्स आणि शस्त्रास्त्र साठवण क्षेत्रांसह केवळ ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी लष्करी लक्ष्यांवरच हल्ला करण्याचा भारतीय लष्कराचा निर्णय लक्षात घेऊन लक्ष्यांची निवड काळजीपूर्वक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्कार्दू येथील पीएएफ हवाई तळ उत्तरेकडील स्थानामुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे आणि भोलारी हवाई तळावर लढाऊ पथके आणि प्रशिक्षण सुविधा आहेत.