करोना महासाथी संपल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. उद्योग, सेवा क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसत आहे. असे असतानाच देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनामध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रत्यक्ष कर संकलन दिवसेंदिवस वाढत असून चालू आर्थिक वर्षात हा आकडा ७ लाख कोटींच्या पुढे पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> NIA ची मोठी कारवाई! तब्बल २३ पथकांची आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये छापेमारी; PFIच्या सदस्यांना घेतले ताब्यात

याबाबतची माहिती देण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. भारत सरकारच्या धोरणांमुळे कर संकलनात वाढ होत आहे. तसेच कर आकारणी पद्धतीला आणखी साधे, सरळ आणि सोपे करण्याच्या सरकारचा प्रयत्न आहे. करगळती थांबवण्याठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केला जात आहे, या सर्व गोष्टींमुळे प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यास मदत होत आहे, असे केंद्र सरकारच्या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पंजाब : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक, खळबळजनक घटनेनंतर विद्यार्थिनी आक्रमक

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १७ सप्टेंबर २०२२ पर्य़ंत ७ लाख ६५९ कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले आहे. मागील आर्थिक वर्ष २०२१-२२च्या तुलनेत हे करसंकलन २३ टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये कॉर्पोरेशन कर (३ लाख ६८ हजार ४८४ लाख कोटी रुपये) आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (३ लाख ३० हजार ४९० लाख कोटी) तसेच वैयक्तिक आयकर (PIT) यांचा समावेश आहे. याच काळात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ५ लाख ६८ हजार १४७ लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India direct tax collection goes to 23 percentage to rs 7 lakh crore during current fiscal so far prd
First published on: 18-09-2022 at 15:41 IST