American Economist Jeffrey Sachs: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर लावलेल्या टॅरिफवरून आता जगभरातून टीका केली जात आहे. एवढेच नाही तर अमेरिकेतील विचारवंत, अर्थशास्त्रज्ञही यावर संताप व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनीही ट्रम्प यांचा निर्णय अविचारी असल्याचे म्हटले.
जेफ्री सॅक्स म्हणाले, अमेरिकेतील राजकारण्यांना भारताची पर्वा नाही. भारत एक मोठी शक्ती आहे. चीनविरोधी क्वाडमध्ये अमेरिकेच्या बाजूने उभे राहून भारताला कोणताही सुरक्षात्मक फायद मिळणार नाहीये.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सॅक्स म्हणाले, “अमरिकेतील राजकारण्यांनी हे समजून घेतले पाहिजे. त्यांना भारताची काहीही पर्वा नाही. भारत ही एक मोठी शक्ती आहे, त्यांचे जगात स्वतंत्र स्थान आहे. चीनविरोधात अमेरिकेच्या बाजूने उभे राहून भारताला दीर्घकालीन सुरक्षितता मिळणार नाहीये. ट्रम्प टॅरिफबाबत जे काही करत आहेत, ते असंवैधानिक आहे.”
भारतीय आयातीवर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी गुरूवारी ओव्हल ऑफिसमध्ये म्हटले की, आयातशुल्काच्या समस्येचे निराकरण होत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील कोणत्याही व्यापार चर्चेला सुरूवात होणार नाही.
ट्रम्प स्वतःचा नाश करत आहेत
अमेरिकेतील आणखी एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि जॉन हॉपिकन्स विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्ह हँके यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. एनडीटीव्हीशी बोलत असताना स्टीव्ह हँके म्हणाले, “ट्रम्प यांचा टॅरिफ वाढीचा निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो दीर्घकाळ टिकणार नाही. त्यांचे अर्थशास्त्र पूर्णपणे गंडले आहे. तसेच व्यापार युद्ध सुरू करून ट्रम्प स्वतःचा नाश करत आहेत.”