नवी दिल्ली : युक्रेनमधील मानवी संकटाबाबत रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) गुरुवारी मांडलेल्या ठरावावर तटस्थ राहून, आपण रशियाच्या बाजूने नसल्याचे संकेत भारताने दिले. या ठरावात युक्रेनवर टीका करण्यात आली होती. ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली समर्थनाची ९ मते न मिळाल्याने हा ठराव संमत होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 रशिया पुरस्कृत ठरावावर भारताने तटस्थ राहण्याचा प्रसंग प्रथमच घडला आहे. यापूर्वी युक्रेनमधील युद्धावर झालेल्या मतदानात, रशियाच्या कृतीवर टीका करणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चिमात्य देशांनी पुरस्कृत केलेल्या ठरावांवर भारत तटस्थ राहिला होता. या ताज्या घडामोडीतील, आपली तटस्थता दर्शवण्याचा भारताचा प्रयत्न प्रतििबबित झाला आहे. न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये ठराव मांडला जात असताना आणि भारताने तटस्थतेचे धोरण स्वीकारले असताना परराष्ट्र सचिव  हर्षवर्धन श्रृंगला तेथे होते. रशिया व चीनने ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर भारतासह यूएनएससीचे उर्वरित १२ सदस्य तटस्थ राहिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India now abstains from voting on russian resolution in un zws
First published on: 25-03-2022 at 02:38 IST