India Pakistan Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर १० मे रोजी शस्त्रविराम झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रविराम करण्यात आला. दरम्यान सैन्यदलांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे पाकिस्तानने आगळीक केल्यास जशास तसं उत्तर मिळेल असंही सांगितलं, आता पाकिस्तानला माफी मिळणार नाही असं जे.डी. व्हान्स यांना मोदींनी सांगितलं आहे. दरम्यान आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यामध्ये नरेंद्र मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, विरोधकांनी केलेली विशेष अधिवेशनाची मागणी, सैन्यदलांची कारवाई, डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी आणि त्यानंतर झालेला शस्त्रविराम या सगळ्याबाबत काय बोलणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. याच संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

India Pakistan Live Updates : "आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर" पंतप्रधान मोदींनी जे. डी.व्हान्स यांच्याकडे मांडली भूमिका, यासह महत्त्वाच्या घडामोडी

04:36 (IST) 13 May 2025

India Pakistan Live Updates : आठ विमानतळांवरील विमानसेवा एअर इंडियाकडून स्थगित

India Pakistan Live Updates : एअर इंडियाने जम्मू, जोधपूर, जामनगर, चंदीगड, अमृतसर, लेह, भूज आणि राजकोट या विमानतळांवरील विमानसेवा स्थगित केली आहे. या विमानतळांवरील १३ मे रोजीची विमानसेवा एअर इंडियाकडून रद्द करण्यात आली आहे.

02:57 (IST) 13 May 2025

India-Pakistan ceasefire LIVE Updates: इंडिगो एअरलाईन्सची सहा विमानतळांवरील सेवा स्थगित

India-Pakistan ceasefire LIVE Updates: इंडिगो एअरलाईन्सने जम्मू, चंदीगड, अमृतसर, लेह, श्रीनगर आणि राजकोट या विमानतळांवरील विमानसेवा स्थगित केली आहे. या विमानतळांवरील १३ मे रोजीची विमानसेवा इंडिगो एअरलाईन्सकडून रद्द करण्यात आली आहे.

02:41 (IST) 13 May 2025

India-Pakistan ceasefire LIVE Updates: अमृतसरमध्ये दिसले पाकिस्तानचे ड्रोन

India-Pakistan ceasefire LIVE Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसले आहेत. परंतु, स्फोट झाल्याची कोणतीही माहिती नसल्याचे अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भूल्लर यांनी म्हटले आहे. भारतीय लष्कराने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.

02:39 (IST) 13 May 2025

India-Pakistan ceasefire LIVE Updates: पंजाबमधील जालंधरमध्ये पाकिस्तानचा टेहळणी करणारा ड्रोन पाडला

India-Pakistan ceasefire LIVE Updates: पंजाबमधील सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. जालंधरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानचा टेहळणी करणारा ड्रोन हाणून पाडला आहे.

01:13 (IST) 13 May 2025

India Pakistan Live Updates : अमृतसरला निघालेले इंडिगोचे विमान दिल्ली विमानतळावर परतले

दिल्लीहून अमृतसरकडे निघालेले इंडिगो एअरलाईन्सचे विमान 6E2045 पुन्हा दिल्ली विमानतळावर परतले आहे. अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. अमृतसर विमानतळ बंद असल्याने हे विमान माघारी परतल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

21:44 (IST) 12 May 2025

PM Modi Speech Updates : "ऑपरेशन सिंदूरला फक्त स्थगिती, पाकिस्तानने आगळीक केली तर…"; वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण

PM Modi Speech on India Pakistan Tensions Operation Sindoor Updates : २२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आश्वस्त तर केलंच, पण पाकिस्तानलाही थेट इशारा दिलाय. त्यांचं भाषण आपण जसं तसं पाहुयात. ...सविस्तर वाचा
21:00 (IST) 12 May 2025

ऑपरेशन सिंदूर राबवताना आम्ही पाकिस्तानचा भेसूर आणि क्रूर चेहरा पाहिला-मोदी

ऑपरेशन सिंदूर राबवत असताना आम्ही पाकिस्तानचा तो भेसूर चेहरा पाहिला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी गेले होते. दहशतवादी देश असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. भारत आणि भारताच्या नागरिकांना कुठल्याही संकटापासून वाचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. युद्धात आपण कायमच पाकिस्तानला धूळ चारली आहे. आता ऑपरेशन सिंदूर राबवून कारवाईचे नवे आयाम आपण आखले आहेत. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

20:47 (IST) 12 May 2025
टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही-मोदींचा पाकिस्तानला इशारा

टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. पाणी आणि रक्ताचे पाटही एकत्र वाहणार नाही. आज मी सगळ्या जगाला सांगतो जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादी कारवाया यांच्यावरच होईल.

20:23 (IST) 12 May 2025

आम्ही आता दहशतवाद मुळीच सहन करणार नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहशतवाद आता भारत सहन करणार नाही. पाकिस्तानचं सरकार दहशतवाद्यांना ज्या प्रकारे पोसतं आहे त्यावरुन हे दिसतं आहे की हे दहशतवादी एक दिवस पाकिस्तानला संपवतील. पाकिस्तानला त्यांचा दहशतवादी ढाचा उद्ध्वस्त करावा लागेल. टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. पाणी आणि रक्ताचे पाटही एकत्र वाहणार नाही. आज मी सगळ्या जगाला सांगतो जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादी कारवाया यांच्यावरच होईल. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने आपल्याला शांततेचा मार्ग दाखवला आहे. प्रत्येक भारतीयाला ही शांतता लाभली पाहिजे. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे यासाठी भारत शक्तिशाली असणं गरजेचं आहे. आवश्यक असल्यास या शक्तीचा प्रयोगही सक्तीचा ठरतो. मागच्या काही दिवसांमध्ये भारताने हेच केलं आहे. मी पुन्हा एकदा भारतीय सैन्य दलांना सशस्त्र दलांना सॅल्युट करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

20:20 (IST) 12 May 2025

"माता भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचा परिणाम...", 'ऑपरेशन सिंदूर'वर पंतप्रधांनानी पहिल्यांदाच साधला जनतेशी संवाद!

PM Modi Speech on Operation Sindoor India Pakistan Tensions Updates ...वाचा सविस्तर
20:18 (IST) 12 May 2025

पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर करारा जवाब मिळणार-पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी आज पुन्हा एकदा सांगतो भारताने पाकिस्तान विरोधातली कारवाई ही फक्त स्थगित केली आहे. पाकिस्तानने आगळीक केली तर त्यावर आपलं लक्ष आहे. भारतावर आता दहशतवादी हल्ला झाला तर करारा जवाब मिळेल. आपण आपल्या पद्धतीने उत्तर द्यायचं. कठोर कारवाई त्या प्रत्येक जागी होईल जिथे दहशतवादाची मूळं रुतली आहेत. पाकिस्तानने अणुबॉम्ब आहे हे सांगून आम्हाला ब्लॅकमेल करु नये. भारताला अचूक कारवाई करता येईल. दहशतवाद्यांना पोसणारं सरकार आणि त्यांच्या म्होरक्यांना आम्ही वेगळे कुणी आहेत म्हणून पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूर राबवत असताना आम्ही पाकिस्तानचा तो भेसूर चेहरा पाहिला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी गेले होते. दहशतवादी देश असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. भारत आणि भारताच्या नागरिकांना कुठल्याही संकटापासून वाचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. युद्धात आपण कायमच पाकिस्तानला धूळ चारली आहे. आता ऑपरेशन सिंदूर राबवून कारवाईचे नवे आयाम आपण आखले आहेत. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

20:12 (IST) 12 May 2025

तीन दिवसांतच आपण पाकिस्तानचं कंबरडं मोडलं-नरेंद्र मोदी

भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादाच्या म्होरक्यांना भारताने एका झटक्यात संपवलं. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान गोंधळून गेला. या गोंधळात त्यांनी एक दुःसाहस केलं. दहशतवादाविरोधात कारवाईला योग्य म्हणण्याऐवजी पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली. महाविद्यालयं, सामान्य नागरिकांची घरं, शाळा, गुरुद्वारे, धर्मस्थळं आपल्या सैन्य छावण्या यांना लक्ष्य केलं. यामध्ये पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. जगाने हे पाहिलं आहे पाकिस्तानचे ड्रोन्स, मिसाईल्स ही भारताच्या सामर्थ्यापुढे विरुन गेली. भारताच्या वायुदलाने आकाशातच त्यांना उत्तर दिलं. पाकिस्तानला सीमेवरच हल्ला करायचा होता. मात्र भारताने त्यांच्या छातीवरच वार केला. भारताचे ड्रोन्स, क्षेपणास्त्र यांनी अचूक हल्ला केला. पाकिस्तानी वायुसेनेच्या हवाई अड्डे उद्ध्वस्त केलं. पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानचं इतकं नुकसान केलं की त्याचा अंदाज पाकिस्तानलाही नव्हता. पाकिस्तान बचाव कसा करायचा ते पाहू लागला.

20:07 (IST) 12 May 2025

ऑपरेशन सिंदूर ही प्रतिज्ञा होती, ती पूर्ण होताना आपण सगळ्यांनी पाहिली-नरेंद्र मोदी

दहशतवादाचा हा चेहरा पाहून प्रत्येक विरोधी पक्ष, प्रत्येक नागरिक भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हे वाटत होतं की तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूर राबवून हे उत्तर आपण दिलं. ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. देशाच्या कोटी कोटी जनतेच्या भावनांचं प्रतीक आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे च्या रात्री उशिरा, ७ मेच्या पहाटे ही प्रतिज्ञा पूर्ण होताना देशाने आणि जगाने पाहिलं आहे. भारताच्या सैन्यदलांनी पाकिस्तानात दहशतवादी अड्डे, त्यांच्या ट्रेनिंग सेंटर्सवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांना हे स्वप्नातही वाटलं नसेल की भारत एवढा मोठा निर्णय आपल्या विरोधात घेईल. पण देश जेव्हा एकवटतो, नेशन फर्स्टही भावना असते तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात. असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

20:04 (IST) 12 May 2025

२२ एप्रिलला दहशतवाचा बीभत्स चेहरा आपण पाहिला-नरेंद्र मोदी

आपण सगळ्यांनी मागच्या काही दिवसांपासून देशाचं सामर्थ्य आणि संयम दोन्ही पाहिलं आहे. आपल्या सैन्यदलांना मी सॅल्युट करतो. मी देशाच्या प्रत्येक मातेला आणि भगिनींना हा पराक्रम अर्पित करतो. २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी जे केलं त्यामुळे सगळा देश हादरुन गेला होता. धर्म विचारुन पर्यटकांना त्यांच्या कुटुंबासमोर, मुलांसमोर निर्घृणपणे ठार करणं हा दहशतवादाचा बीभत्स चेहरा होता. क्रौर्य होतं, देशाची सद्भवना तोडण्याचा प्रयत्न झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

19:19 (IST) 12 May 2025

Aaditya Thackeray on Kashmir Conflict : "काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही", मोदींच्या भाषणाआधीच आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याचवेळात जनतेशी संवाद साधणार आहेत. त्याआधीच आदित्य ठाकरे यांनी काश्मीर मुद्द्यावरून पोस्ट केली. ...वाचा सविस्तर
17:27 (IST) 12 May 2025

Satara Prasad Kale News : लग्न लागलं, पूजा झाली, पण ओल्या हळदीच्या अंगानेच जवान सीमेवर दाखल; नववधू म्हणते, "मी स्वतःला..."

Satara Soldier Story | साताऱ्यातील खटाव तालुक्यातील काळेवाडी गावचा जवान प्रसाद काळे यांनाही ओल्या अंगानेच सीमेवर जावं लागलं आहे. यासंदर्भात त्यांच्या पत्नी वैष्णवी यांनी अत्यंत भावूक पण प्रत्येक महिलेला अभिमान वाटेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. ...सविस्तर बातमी
16:28 (IST) 12 May 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार, भाषणाकडे अवघ्या जनतेचं लक्ष

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचं आज रात्री भाषण होणार आहे. या भाषणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

15:40 (IST) 12 May 2025

Video: पाकिस्तानचे हवाई हल्ले रोखण्यासाठी कशी तयारी केली? भारताचे डीजीएमओ राजीव घई यांनी सांगितले बारकावे!

India Pakistan News Updates: पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेनं कसे निष्प्रभ केले? डीजीएमओंनी दिली माहिती! ...अधिक वाचा
15:18 (IST) 12 May 2025

भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानची १५ विमानं पाडली-राजीव घई यांची माहिती

भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानची १५ विमानं पाडली. "जब हौसलों बुलंद हों, तो मंजिलें भी कदम चूमती हैं" अशी शायरीही लेफ्टिनेंट जनरल राजीव घई यांनी यावेळी म्हटली.

आपली हवाई सुरक्षा प्रणाली म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टीम देशासाठी अभेद्य भिंत बनून उभी होती. या भिंतीला धडक देणे शत्रू राष्ट्राला अशक्यच होते, असे भारती यांनी म्हटले. तसेच, ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय वायू दलाने दहशतावाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्याचे काही फोटो व व्हिडिओ दाखवले. भारताच्या एकाही एअर बेसवर शत्रू राष्ट्राकडून हल्ला झाला नाही. भारतीय हवाई दलाचे सर्वच तळ सुरक्षित आहेत. हवाई दलाने कुठल्याही संशयास्पद वस्तूला एअर बेसजवळ पोहोचू दिले नाही.

14:45 (IST) 12 May 2025

पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करणारा देश-एके भारती

पाकिस्तानी सेना दहशतवाद्यांना मदत करते आहे. आम्ही जी कारवाई केली ती फक्त आणि फक्त दहशतवाद्यांचे तळ आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी केली. पाकिस्तानने मात्र दहशतवाद्यांना साथ दिली. ही लढाई आपली लढाई आहे असं मानत भारतावर हल्ले केले. ज्याला आपण उत्तर दिलं.

14:39 (IST) 12 May 2025

पाकिस्तानने दहशतवाद्यांनना पाठिंबा दिला, भारतीय सैन्यदलांनी काय सांगितलं?

पाकिस्तानला आम्ही योग्य शब्दांमध्ये उत्तर दिलं. आपली लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या विरोधात होती. त्यामुळे ७ मेच्या रात्री आम्ही फक्त दहशतवादी तळांवरच हल्ला केला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली. ही लढाई स्वतःची लढाई आहे असं मानून भारताला उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारताने त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर दिलं.

14:34 (IST) 12 May 2025

"मुंबईला सातत्याने…" राज्य सरकारची लष्कराच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वाची चर्चा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत भारतीय लष्कराचे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग, भारतीय नौदलाचे महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, भारतीय हवाई दलाचे एअर व्हाइस मार्शल, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे डीजीपी, गृह आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...वाचा सविस्तर
12:58 (IST) 12 May 2025

दुपारी अडीच वाजता सैन्यदलांची पत्रकार परिषद

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्र विरामानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये पहिल्यांदाच चर्चा होते आहे. भारतातर्फे जनरल राजीव घई चर्चा करत आहेत. दुपारी अडीच वाजता काय माहिती दिली जाते त्याकडे संपूर्ण देशाकडे लागलं आहे.

12:48 (IST) 12 May 2025

भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंची चर्चा सुरु, दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या डीजीओएमओंची चर्चा सुरु झाली आहे. आता पाकिस्तानपुढे कुठल्या अटी भारत ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्यानंतर काय चर्चा झाली त्याची माहिती दिली जाणार आहे.

India Pakistan News Live Updates

ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानचा पुरेपूर सूड घेतला आहे. पाकिस्तानमधले अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर १० मे रोजी शस्त्रविराम झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रविराम करण्यात आला. दरम्यान सैन्यदलांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे पाकिस्तानने आगळीक केल्यास जशास तसं उत्तर मिळेल असंही सांगितलं, आता पाकिस्तानला माफी मिळणार नाही असं जे.डी. व्हान्स यांना मोदींनी बजावून सांगितलं आहे.