जगप्रसिद्ध स्टॉकहोम इंटरनेशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूटच्या या संस्थेने जगभरात संरक्षण दलावर होणाऱ्या खर्चाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार भारत आता तिसऱ्या क्रमांकाचा संरक्षणावर खर्च करणार देश ठरला आहे. तर अमेरिका आणि चीन यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे हे स्थान कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे अमेरिका, चीन, भारत. इंग्लंड आणि रशिया या पाच देशांचा वाटा एकुण जगभरातील खर्चापैकी ६२ टक्के एवढा आहे.

भारताने गेलल्या दशकभरापासून संरक्षण दलावरील खर्च सातत्याने वाढवत नेला असून आता हा खर्च ७६.६ अब्ज डॉलर्स एवढा पोहचला आहे. म्हणजेच भारताने ५ लाख ८७ हजार कोटी रुपये हे २०२१ मध्ये खर्च केले. २०२० च्या तुलनेत या खर्चात ०.९ टक्के एवढी अल्प वाढ असली तरी २०१२ च्या तुलनेच ही वाढ ३३ टक्क्यांनी झाली आहे हे विशेष. पाकिस्तान विरुद्ध संघर्षाचे वातावरण कायम असले तरी गेल्या काही वर्षात चीनच्या सीमेवरी तणाव वाढला असल्याने संरक्षण दलावरील खर्चात वाढ झाल्याचं मत या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

तर जगातील संरक्षणावरील एकुण खर्चापैकी अमेरिकेचा वाटा ३८ टक्के एवढा लक्षणीय आहे. अमेरिकेने २०२१ मध्ये तब्बल ८०१ अब्ज डॉलर्स खर्च केला आहे. तर २०२० या वर्षाच्या तुलनेत अमेरिकेचा संरक्षणावरील खर्च १.४ टक्क्यांनी जरी कमी झाला असली तरी संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि विकासावरच्या खर्चात २४ टक्क्यानी वाढ केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संरक्षण क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावरील खर्च ही चीनचा असून २०२१ मध्ये २९३ अब्ज डॉलर्स खर्च संरक्षणावर खर्च केले आहेत. २०२० च्या तुलनेत ४.७ टक्क्यांनी ही वाढ केली आहे. तर इंग्लंडचा २०२१ या वर्षात संरक्षणावरील खर्च हा ६८.४ अब्ज डॉलर्स एवढा आहे तर रशियाचा ६५.९ अब्ज डॉलर्स आहे.गेल्या काही वर्षात तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारीतल दर हे कमी असल्याने रशियाचा संरक्षणावरील खर्च घटना असल्याचं निरीक्षण स्टॉकहोम संस्थेने नोंदवले आहे.