देशभराती करोना संसर्गाची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. याशिवाय करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रूग्णही आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही दररोज भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून करोना संसर्गाचा अधिक प्रमाणात प्रसार झालेल्या राज्यांना विशेष सूचना देखील दिल्या गेल्या आहेत.

मागील २४ तासांमध्ये देशभरात अडीच लाखांहून जास्त म्हणजे २ लाख ६४ हजार २०२ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या कालच्या रूग्ण संख्येच्या तुलनेत ६.७ टक्के अधिक आहे. याशिवाय ५ हजार ७५३ ओमायक्रॉनबाधितही आढळलेले आहेत.

Nagpur Lok Sabha Small increase in voter turnout what does it signal
नागपूर लोकसभा : मतदान करणाऱ्यांच्या संख्येत अल्प वाढ, संकेत काय?
epfo adds 1 65 crore net members during the fy 24
‘ईपीएफओ’च्या सदस्यसंख्येत वर्षभरात १.६५ कोटींची भर
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?

तसेच, मागील २४ तासांमध्ये देशभरात १ लाख ९ हजार ३४५ रूग्ण करोनामुक्त देखील झाल्याचे समोर आले आहे. सध्या देशात १२ लाख ७२ हजार ७३ अॅक्टीव्ह केसेस असून, पॉझिटिव्हिटी रेट १४.७८ टक्के आहे.

याशिवाय देशात मागील २४ तासात ३१५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झालेला असून, आजपर्यंत एकूण ४,८५,३५० करोनाबाधित रूग्णांचा देशभरात मृत्यू झालेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींची या वर्षातील मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक होती. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला बळकटी देण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी, ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असेही म्हटले आहे.