पीटीआय, कोलंबो

भारत आणि श्रीलंकेदरम्यान शनिवारी महत्त्वाकांक्षी संरक्षण सहकार्य करार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांच्यादरम्यानच्या चर्चेनंतर, दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या द्विपक्षीय सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान मोदी थायलंडचा दौरा आटोपून शुक्रवारपासून श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सन्मानार्थ शनिवारी कोलंबोच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य चौकात स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला.

संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या केल्या जात असताना, भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांची सुरक्षा एकमेकांशी निगडित आणि परस्परांवर अवलंबून आहे असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी मजबूत द्विपक्षीय सहकार्यासाठी व्यापक आराखडा मांडला. या शेजारी देशांदरम्यान प्रथमच अशा प्रकारचा संरक्षण सहकार्य करार केला जात आहे. दोन्ही देशांदरम्यानचे सामरिक संबंध मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

यापूर्वी राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८७मध्ये ‘लिट्टे’ या दहशतवादी संघटनेचा सामना करण्यासाठी श्रीलंकेत ‘भारतीय शांतीसेना’ पाठवण्यात आली होती. त्यानंतर जवळपास ३८ वर्षांनंतर अशा प्रकारचा सहकार्य करार केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत श्रीलंकेच्या त्रिणकोमालीचा ऊर्जा हब म्हणून विकास करण्यासाठी सहकार्य करणार आहे. तसेच मोदी व दिसनायके यांनी सामपूर सौर ऊर्जा प्रकल्पाचे दूरदृश्य प्रणालीने उद्घाटन केले.