काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी एका बातमीवर प्रतिक्रिया देताना भारत सरकारवर निशाणा साधालाय. भारतीय अधिकाऱ्यांनी गुपचूप तालिबानची भेट घेतल्याचा दावा केलाय. दिग्विजय सिंह यांचं हे ट्विट अशा वेळी आलं आहे जेव्हा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये अफगाणिस्तानसंदर्भातील विषयामधील चर्चेत सहभागी झाले. भाजपा आयटी सेलच्या दृष्टीने भारतीय अधिकाऱ्यांनी तालिबानशी चर्चा करणं हा देशद्रोह नाहीय का?, असा टोलाही दिग्विजय यांनी लगावलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीबीसीची एक बातमी ट्विट करत राज्यसभा खासदार असणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी, “हा खूप गंभीर विषय आहे. यासंदर्भात भारत सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावं. भाजपाचा आयटी सेल या गोष्टीची दखल घेऊन या देशद्रोहा म्हणेल का?,” असा सवाल उपस्थित केलाय.

नक्की वाचा >> पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना दिलं जातं पेन्शन; UNHRC मध्ये भारताचा पाकवर हल्लाबोल

दिग्विजय सिंह यांनी जी बातमी शेअर केलीय त्यामध्ये ‘द हिंदू’मधील वृत्ताच्या आधारे भारतीय अधिकाऱ्यांनी कतारची राजधानी असणाऱ्या दोहामध्ये तालिबानची भेट घेतल्याचा दावा करण्यात आलाय. या वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार भारतीय अधिकारी कतारला जाण्यामागे तालिबानी नेत्यांसोबत बैठक घेणे हा एकमेव उद्देश होता असं म्हटलं आहे. भारत पहिल्यांदाच थेट तालिबानशी चर्चा करत असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. “तालिबानी नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी दौरा केला असं मला वाटतं,” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘द हिंदू’ला दिल्याचा दावा करण्यात आलाय.


जयशंकर काय म्हणाले?

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी, “भारत अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांचे समर्थन करतो. यामध्ये अफगाणिस्तानसोबतच्या चर्चेचाही समावेश आहे,” असं मत व्यक्त केल्यानंतर भारतीय अधिकारी आणि तालिबानी नेत्यांच्या भेटीची बातमी समोर आलीय.

नक्की वाचा >> Coronavirus: भारताच्या मदतीसाठी पाकिस्तानी संस्थांनी गोळा केले कोट्यावधी रुपये दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाण्याची भीती

दुहेरी शांततेची गरज…

अफगाणिस्तानमध्ये कायमस्वरुपी शांततात नांदावी म्हणून खऱ्या अर्थाने देशांतर्गत शांततेबरोबरच त्याच्या आसपासच्या भागांमध्ये दुहेरी शांततेसाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत जयशंकर यांनी मंगळवारी व्यक्त केलेलं. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये सीमेवरील दहशतवादाबरोबरच कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणारी अशी भूमिका घेणे गरजेचे असल्याचं मत नोंदवलं होतं.

नक्की पाहा >> Video: फाईल्सने हल्ला, शिव्या, आरडाओरड अन्… पाकिस्तानी संसदेतील गोंधळाचे झाले Live टेलिकास्ट

भारत हे का करतोय?

जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेदरम्यानच्या चर्चेमध्ये बोलताना, हिंसेचं प्रमाण कमी व्हावं आणि सर्वसामान्य नागरिक सुरक्षित रहावेत म्हणून भारत अफगाणिस्तानमध्ये कायम स्वरुपी आणि व्यापक युद्धबंदीसाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. “अफगाणिस्तानमध्ये कायम स्वरुपी शांततेसाठी खऱ्या अर्थाने दुहेरी शांततेचा विचार करुन त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची म्हणजेच देशांतर्गत आणि देशाच्या आजूबाजूच्या परिसरात शांततेसाठी प्रयत्न केला पाहिजे. सर्वांचं हित लक्षात घेऊन सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे,” असं जयशंकर म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India talking with taliban is not anti national for bjp it cell asks digvijaya singh by tweet scsg
First published on: 23-06-2021 at 11:57 IST