India to become 4th largest economy in 2025 : आंतरराष्ट्रीय नाणे निधी(IMF) च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक एप्रिल २०१५ च्या ताज्या आवृत्तीनुसार भारत २०२५ मध्ये जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले. भारताचा नॉमिनल जीडीपी २०२५ (आर्थिक वर्ष २०२६) साठी ४,१८६.४३१ अब्ज डॉलर्स असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, जो की जपानच्या अंदाजे ४,१८६.४३१ अब्ज डॉलर्सच्या जीडीपीपेक्षा काहीसा जास्त असेल.
२०२४ पर्यंत भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होता, परंतु आयएमएफच्या ताज्या अंदाजानुसार चालू वर्षात भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी अपेक्षा आहे. तसेच येत्या काही वर्षांमध्ये भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसर्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. २०२८ पर्यंत भारताचा जीडीपी ५,५८४.४७६ अब्ज डॉलर्स होईल असा अंदाज आहे, जो जर्मनीच्या ५,२५१.९२८ अब्ज डॉलर्स जीडीपीपेक्षा जास्त आहे. २०२७ मध्ये भारत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, ज्याचा जीडीपी ५,०६९.४७ अब्ज डॉलर्स इतका असेल.
दरम्यान अमेरिका आणि चीन हे दोन देश २०२५ मधील जगातील सर्वात मोठ्या दोन अर्थव्यवस्था म्हणून कायम राहातील. तसेच आएमएफच्या अंदाजानुसार, हे दोन देश पुढील दशकभर तरी या स्थानावर कायम राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आएएमएफने त्यांच्या रिपोर्टमध्ये २०२५ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा दराचा अंदाज हा ६.२ टक्के वर्तवला आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात प्रकाशित केलेल्या आऊटलूक रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आलेल्या ६.५ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा हा कमी आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे अलेल्या अनिश्चितता हे वाढीचा दर कमी दाखवण्यामागील कारण आहे.