भारताच्यादृष्टी
१९८९ मध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया हिच्या सुटकेसाठी भारताला पाच दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती. तर १९९९च्या डिसेंबर महिन्यात दहशतवाद्यांकडून भारताच्या आयसी-८१४ या विमानाचे अपहरण करण्यात आल्यानंतर प्रवाशांच्या सुटकेसाठी वाजपेयी सरकारला मसुद अझर, ओमर शेख आणि मुश्ताक अहमद झरगर या दहशतवाद्यांना सोडावे लागले होते. या दोन्ही घटनांपैकी १९८९ मध्ये दुलत इंटेलिजन्स ब्युरोच्या श्रीनगरमधील विभागाचे प्रमुख होते. तर कंदहार विमान अपहरणावेळी दुलत ‘रॉ’च्या प्रमुखपदी होते. या दोन्ही प्रसंगांमध्ये आलेले अनुभव दुलत यांनी आपल्या ‘काश्मीर- द वाजपेयी इयर्स’ या पुस्तकातून सांगितले आहेत. कंदहार विमान अपहरण प्रकरणात पाकिस्तानी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा हात असल्याचेही दुलत यांनी पुस्तकात म्हटले आहे. कारण, आयएसआयच्या पाठिंब्याशिवाय अशा प्रकारच्या दहशतवादी मोहिमा पार पाडणे अशक्य असल्याचे मत दुलत यांनी व्यक्त केले. कंदहार अपहरण प्रकरणात पाच दहशतवाद्यांची सुटका करण्याचा निर्णय झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला चांगलेच संतापले होते, रागाच्या भरात ते राजीनामाही द्यायला तयार होते, त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांना दूरध्वनी करुन आपला निषेध नोंदविल्याची आठवण दुलत यांनी सांगितली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2015 रोजी प्रकाशित
कंदहार विमान अपहरणावेळी दहशतवाद्यांवर अचानक हल्ला करण्याची योजना होती…
भारताच्यादृष्टीने नामुष्कीच्या ठरलेल्या दोन घटनांवेळी गुप्तहेर संस्थेचे प्रमुख असणारे ए. एस. दुलत यांनी नुकत्याच प्रकाशित आपल्या पुस्तकातून तत्कालीन राजकीय घडामोडींविषयी काही गौप्यस्फोट केले आहेत.

First published on: 03-07-2015 at 11:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India wanted to raid ic 814 in dubai farooq abdullah opposed swap ex raw chief as dulat