दीपक जोशी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९७५ आणि १९७९च्या विश्वचषकात सामने झाले नाहीत. १९८३पासून आतापर्यंत विश्वचषकाचे ११ सामने झाले. यापैकी आठ सामने ऑस्ट्रेलियाने व तीन सामने भारताने जिंकले आहेत. भारताने १९८३ आणि १९८७च्या विश्वचषकांमध्ये ऑस्ट्रेलियाला नामोहरम केल्यानंतर तिसऱ्या विजयासाठी २४ वष्रे प्रतीक्षा केली. २०११च्या विश्वचषकात युवराज सिंगच्या अष्टपैलुत्वाची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे आता आठ वर्षांनी विराट कोहलीचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय साकारतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. १९८०पासून या संघांमध्ये १३६ एकदिवसीय सामने झाले. यापैकी ७७ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर भारतीय संघ अर्धशतकी विजयाच्या उंबरठय़ावर आहे.