scorecardresearch

Turkey Earthquake : भारत सरकार करणार टर्की देशाची मदत, भूकंपग्रस्त भागात पाठवणार रेस्क्यू टीम

सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास टर्कीमध्ये तब्बल ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले.

turkey-eartquake
टर्की भूकंप (फोटो – रॉयटर्स)

सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास टर्कीमध्ये तब्बल ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात टर्की आणि सिरियामध्ये १२०० जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या भूकंपात जीवितहानीसोबतच मोठी वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे जगभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. दरम्यान, भारत सरकार टर्की देशाची मदत करण्यासाठी रेस्क्यू टीम पाठवणार आहे. तसेच भूकंपग्रस्त लोकांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक, तसेच अन्य सामान पाठवले जाणार आहे.

हेही वाचा >>> Turkey Earthquake: ५०० हून अधिक लोकांचे बळी घेणाऱ्या टर्कीमधील भूकंपाची तीन दिवस आधीच आली होती कल्पना, ‘ते’ ट्वीट व्हायरल!

टर्कीमधील भूकंपानंतर भारत सरकारची उच्चस्तरीय बैठक

टर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच भारताकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासहीन मोदी यांनी दिले आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे मुख्य सचिव डॉ. पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर टर्कीमधील भूकंपग्रस्त भागाला मदत करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.

हेही वाचा >>> परवेझ मुशर्रफ यांची स्तुती करणाऱ्या शशी थरूर यांच्यावर भाजपाने केली टीका, म्हटले…

दोन टीममध्ये एकूण १००० कर्मचारी

भारत सरकारकडून टर्कीमध्ये एनडीआरएफच्या दोन टीम पाठवल्या जाणार आहेत. या दोन टीममध्ये एकूण १००० कर्मचारी असतील. तसेच उत्तम प्रशिक्षण दिलेले श्वानपथके यामध्ये असतील. या बचावपथकासोबत आवश्यक ती सर्व उपकरणं दिली जातील. बचावपथकाकडून भूकंपग्रस्त भागात शोधमोहीम राबवली जाणार आहे. तसेच जखमी लोकांवर उपचार करणारी एक डॉक्टरांची टीमदेखील पाठवली जाणार आहे. या टीममध्ये प्रशिक्षित डॉक्टर्स असतील.

हेही वाचा >>> शिवाजी महाराजांविषयीच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांचे नवे ट्वीट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “मी जे बोललो ते…”

दरम्यान, टर्कीमधील या भूकंपामध्ये साधारण १२०० लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आमच्याकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन जगभरातून दिले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 17:20 IST
ताज्या बातम्या