करोना व्हायरसविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या कोविड योद्ध्यांना भारतीय सेनाकडून अनोख्या पद्धतीनं सलामी दिली जात आहे. रविवारी आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत हा कार्यक्रम झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय हवाईदलाकडून सुखोईसारख्या लढावू विमानांनी कोलकाता, मुंबई आणि दिल्लीसारख्या देशातील वेगवेगळ्या शहरात कोविड रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करत आहे. भारतीय लष्कराचे बॅन्ड या रुग्णालयांजवळ करोना योद्ध्यांचं मनोबल वाढवणार आहेत. तर भारतीय नौदल आपल्या युद्धनौका दिव्यांनी उजळवत करोना योद्धांना सलामी देणार आहे.


कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्सने फ्लाय पास्ट केले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरातचं कच्छ असे दोन फ्लायपास्ट एअर फोर्सकडून करण्यात आले. यामध्ये सुखोईसारखी भारताची अत्याधुनिक फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टचा समावेश होता. समुद्रात भारतीय नौदलांकडूनही कोविड योद्ध्यांना सलामी देण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian air force aircraft flypast coronavirus warriors nck
First published on: 03-05-2020 at 11:27 IST