भारतीय हवाई दल पुढील दोन दशकात ३५० विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे. एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी बुधवारी ही माहिती दिली. हवाई दलप्रमुखांनी भारतीय एरोस्पेस क्षेत्रावरील एका परिषदेत आपल्या भाषणात चीनबाबत भेडसावत असलेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाची एकूण ताकद अधिक मजबूत करण्यासाठी विविध क्षमता विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले.

हवाई दलाचे प्रमुख म्हणाले, “उत्तरेकडील शेराऱ्यांकडे पाहता, आमच्याकडे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असले पाहिजे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव ते आपल्या उद्योगाद्वारे देशातचं देशातच बनले पाहिजे.

हेही वाचा- ऐतिहासिक! महिलांना मिळणार NDA मध्ये प्रवेश, कायमस्वरूपी कमिशनचा मार्गही मोकळा

विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी आहे यावर भर देत एअर चीफ मार्शल भदौरिया म्हणाले की, भारतीय हवाई दल पुढील दोन दशकात देशातूनच सुमारे ३५० विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे. हा फक्त अंदाज असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

भदौरिया, म्हणाले तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रकल्पामुळे भारतातील एरोस्पेस उद्योगामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि पुढील विकासाची अफाट क्षमता असल्याचा आत्मविश्वासही निर्माण झाला आहे.