शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं भारतीय लष्कराच्या चौक्यावर उखळी तोफांसह गोळीबार केला होता. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर जम्मू काश्मीरातील करमरा गावात तीन जिवंत उखळी तोफा सापडल्या होत्या. त्या भारतीय लष्कराकडून नष्ट करण्यात आल्या आहेत. उखळी तोफा नष्ट करतानाचा एक व्हिडीओ ‘एएनआय’ने जारी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. जम्मू काश्मीरातील कलम ३७० रद्द केल्यापासून शस्त्रसंधी उधळून लावण्याच्या घटना सातत्यानं होत असून, पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचेही प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, रविवारी पाकिस्तानकडून सीमेवर आगळीक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भारतीय लष्करानं जबरदस्त कारवाई करत पाकला उत्तर दिलं.

या कारवाई दरम्यान, दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. यात जम्मू काश्मीरमधील करमरा गावात तीन पाकिस्तानी उखळी तोफा आढळून आल्या होत्या. याची माहिती लष्कराला देण्यात आली. त्यानंतर जवानांनी या तोफा नष्ट केल्या. या उखळी तोफा नष्ट करतानाचा व्हिडीओ तयार करण्यात आला असून, ‘एएनआय’नं तो प्रसिद्ध केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army yesterday destroyed 3 mortar shells of pakistan bmh
First published on: 22-10-2019 at 11:58 IST